रत्नागिरी : तोंडाला पाणी सुटावं असा बारीक आणी लांब बासमती तांदूळ, पुलाव, बिर्याणीची लज्जत वाढवतो. सद्यस्थितीत हा तांदूळ बाहेरील राज्यातून येतो. मात्र आता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या शिरगाव (रत्नागिरी ) येथील भात संशोधन केंद्रात 'रत्नागिरी १५ एम एस ५२ ' हे नवीन वाण विकसित करण्यात यश आले आहे. बासमतीसारख्याच लांब असलेल्या या तांदळाचे वाण भातासह पोह्यांसाठीही उपयुक्त ठरणार आहे.
0 Comments