* नारळाच्या झाडाचे महत्त्व *
• महाराष्ट्रातील कोकण विभाग आणि दक्षिणेतील केरळ हे राज्य नारळ वनांसाठी प्रसिद्ध आहेत. नारळाच्या पानांचा वापर झाडू (खराटा) बनवण्यासाठी होतो.
• नारळपाणी हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. ते पाणी आजारपणात ग्रहण केले जाते. ओला नारळ विकण्यासाठी ठेवलेला आपण अनेकवेळा आपल्या बाजारात पाहत असतो.
• कोकण आणि भारतातील समुद्रकिनारी नारळाचे झाड व नारळ हे प्रमुख आकर्षणाचा मुद्दा असतो. तेथील नारळबागा आणि त्यामुळे लाभलेले निसर्गसौंदर्य हे अगदी विलक्षण असते.
• नारळातील खोबरे हे आपण आहारातील कालवणात बारीक किस करून वापरतो आणि काहीवेळा पदार्थ म्हणून देखील खातो. घरातील चटणी (लाल तिखट) बनवण्यासाठी देखील खोबरे वापरले जाते.
• खोबरेल तेल हे पूर्वीपासून आजपर्यंत केसांसाठी वापरले जात आहे. वेगवेगळे तेलाचे ब्रॅण्ड हे फक्त नारळावर प्रसिद्ध झालेत. तसेच खोबरेल तेल अंगाची मालिश करतानाही उपयोगात आणतात.
• नारळ सुकल्यावर आपण वरील साल (केसर) काढतो आणि त्याचा उपयोग जळणात आणि भांडी घासताना होत असतो.
• नारळाचे मजबूत कवच हे शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी वापरतात.
• अशा प्रकारे एक नारळाचे झाड हे अनेक प्रकारे मनुष्य जीवनात आधार बनत असल्याने त्याला कल्पवृक्ष असेही संबोधले जाते.
तुम्हाला नारळाच्या झाडाचे महत्त्व हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…
0 Comments