हृदयात प्रेमाची भावना कशी तयार होते, जाणून घेऊ आज!

कॉम्प्लेक्स इमोशन म्हणजे काय, हृदयात प्रेमाची भावना कशी तयार होते, जाणून घेऊ आज!

            कॉम्प्लेक्स इमोशन म्हणजे काय, दोन भावनांमधून तिसऱ्या भावनेची निर्मिती कशी होते आणि हृदयात प्रेमाची भावना कशी तयार होते? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या जीवन मंत्रच्या भागात जाणून घेणार आहोत, भावनिक बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशन वतनी यांच्याकडून.

            रॉबर्ट प्लुचिक या मानसशास्त्रज्ञाने मांडलेल्या आनंद-दुःख, राग-भीती, अपेक्षा-आश्चर्य, विश्वास-घृणा या आठ प्राथमिक भावनांचा उत्क्रांतीवादी सिद्धांत आपण गेल्या काही भागात जाणून घेतला. आता त्याच्याच पुढच्या पायरीने आपला प्रवास सुरू ठेवू.

प्राण्यामध्ये नाही...

रॉबर्ट प्लुचिकने सांगितलेल्या आठ भावनांपैकी जेव्हा एक किंवा दोन भावना एकत्र येतात, तेव्हा एक तिसरीच भावना तयार होते. तिलाच कॉम्प्लेक्स इमोशन म्हणतात. प्राण्यांमध्ये ही भावना आढळून येत नाही. मात्र, मानवामध्ये या उच्च पातळीवरच्या कॉम्प्लेक्स इमोशनचा अनुभव येतो.

चिंता अन् आशा...

पुढे काय होणार? या भावनेमध्ये भीती ही भावना मिसळली, तर या दोन्हींमधून जी नवी भावना तयार होते, तिला चिंता म्हणतात. पुढे काय होणार + चिंता = भीती, असे हे सूत्र. पुढे काय होणार + आनंद या दोन भावना एकत्र आल्या. तर त्यातून निर्माण होणाऱ्या तिसऱ्या भावनेला आशा म्हणतात.

प्रेमाचे डिकोडिंग...

आपल्याला प्रेमाचे डिकोडिंगही असेच करता येईल. विश्वास + आनंद = प्रेम. आता अनेकांवर आपला विश्वास असतो. आपले ऑफिसमधले सहकारी किंवा इतर मित्र. मात्र, त्यांना आपल्याला रोज भेटावे वाटत नाही. त्यांच्याबद्दल आपली फक्त विश्वास हीच भावना असते.

मामला गडबड...

आपल्या जीवनात असेही काही मित्र, मैत्रिणी असतात. ज्यांना आपल्याला सतत भेटावे वाटते. त्यांच्याबाबत आपल्याला आनंद वाटत असतो. त्याची पुन्हा-पुन्हा अनुभुती घ्यावी वाटते. मात्र, त्यांच्याबद्दल विश्वास वाटत नसतो. जर एखाद्याला सतत भेटावे वाटत असेल. त्या भेटीतून आनंदही वाटत असेल. सोबतच विश्वासही असेल, तर समजा मामला गडबड आहे. ते म्हणजे प्रेम.

Post a Comment

0 Comments