मेंदूचे कोडे आणि बाळकडू ! भाग १

 

मेंदूचे कोडे आणि बाळकडू !


Brain puzzel Latest News 28-03-2023

आपल्याला आपले बालपणीचे दिवस आठवतात का ? जर त्या दिवसांमध्ये एक फेरफटका मारून आलो तर तुम्हाला कसं वाटेल  ? आपण रहात होतो ते घर ,तिथली बाग, तिथले शेजारी, आपल्या मित्र-मैत्रिणी, शाळा ,शाळेत मिळालेली शिक्षा किंवा बक्षीस सगळं सगळं आठवत राहतं. आता आपल्या समोरची मुलं बालपण अनुभवून भविष्यकाळात प्रवेश करणार असतात आणि त्याबद्दल त्यांना नेमकं काहीच माहित नसतं. बरोबर ? मग आपण जशा सुखद जादुई अशा काही आठवणी जगलो तर त्यांच्यासाठी, मुलांसाठी आठवणी निर्माण करण्याची जबाबदारी आपलीच आहे . मुल ,मग ते कोणतही असो ,निष्पाप ,गोंडस असतंच. म्हणूनच मग पालक किंवा शेजारी किंवा वेलविशर्स कोणीही , त्यांच्या विकासासाठी विविध बाजूंनी लक्ष केंद्रित करायला पाहिजे .त्यांचा शारीरिक, सामाजिक, भावनिक विकास, आकलन क्षमता ,कारक अवस्था या सगळ्यांकडेच लक्ष द्यायला लागतं. पण हे काम कठीण का जातं ? याच एक कारण म्हणजे प्रत्येक मूल वेगळं असतं . त्याचबरोबर त्यांचे अनुवंशिक,व निसर्गादत्त गुण . त्यानंतर आजूबाजूची परिस्थिती, कुटुंब, शाळा, मित्र, समाज जिथून कुठून ते मुल येतं ,त्याप्रमाणे त्याच्याशी वागण्याची किंवा त्याला वाढवण्याची वेगवेगळी गरज असू शकते . त्यामुळे ठोकळेपणाने एकाचाच उपाय दुसऱ्याला लागू होत नाही आणि मग ते बाल संगोपन कठीण होऊन बसतात.

बरेचदा तर कुठल्याही एका समस्येला वेगवेगळ्या ठिकाणाहून किंवा तज्ञांकडून देखील वेगवेगळे उपाय सांगितले जातात, याला काय कारण असावं ? आणि मग कुठल्याही पालकांचे किंवा केअरटिकल्सचे प्रश्न खूप कठीण होऊन जातात.

उदाहरणार्थ एखादा मुलगा अंगठा चोखतो. तर एक डॉक्टर सांगतील की त्याला काहीतरी ताण आहे तो शोधून काढा , तर दुसरे डॉक्टर म्हणतील की थोड्या दिवसांनी आपोआपच हे बंद होईल त्याला मुद्दाम म्हणून असं काही म्हणू नका त्या ऐवजी त्याला दुसरं काहीतरी करायला द्या असं सांगतात . असं का ? याला कारण आहेत . वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी बालविकासनाचे वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहे. जे तज्ञ जो सिद्धांत फॉलो करतात तशी उत्तरे मिळतात. याचा थोडक्यात आढावा घेऊ, फार खोलात आपण शिरणार नाही.

* मनोविश्लेषणावर भर देणारे तज्ञ विकासाच्या विविध टप्प्यांवर सामाजिक अपेक्षा व शारीरिक गरजा यातील संघर्ष आणि त्यावर आधारित, व्यक्तीची इतरांशी जमवून घेण्याची क्षमता आणि चिंता ठरत असते , असा विचार करतात. उदाहरणार्थ फ्रॉइड सारखे विचारवंत, इड, इगो आणि सुपर इगो यांना महत्त्व देतात ,

* तर एरिक्सन सारखे विचारवंत आयुष्याच्या वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळे संघर्ष असल्याचे सांगतात .प्रत्येक टप्प्यात एक संघर्ष आणि जर त्याचं सकारात्मक दृष्ट्या निराकरण झालं तर त्याचं भविष्य उज्वल असतं .म्हणूनच एरिक्संच्या बालविकासनाच्या सिद्धांतानुसार प्रत्येकच जीवनावस्था ही एक पेच प्रसंग ठरते. उदा. आपण सध्या शून्य ते सहा वर्ष या वयोगटापर्यंतचाच विचार करतो आहोत तर त्यानुसार एरिक्सनचया संघर्षाचे टप्पे बघू.

अर्भकावस्था (० ते १८ म.) विश्वास विरुद्ध अविश्वास —-सातत्याने मायेची उब — भीती चिंता
बाल्यावस्था ( १८ म ते ३ व.) स्वायत्तता विरुद्ध शंका —- स्वावलंबनाचे पोषण —स्वक्षमतांच्या चिंता
आत्मसन्मानात वाढ
पूर्णपणे बाल्यावस्था ( ३ ते ६ व.) पुढाकार वि. अपराधी —-कृतींचा पुढाकार ,— अतिनियंत्रण
सामाजिक जाणीव.

*वर्तनवादी विचारवंत हे कंडिशनिंग वर भर देणारे आहे.
* पियाजे सारखा विचारवंत हा विचारांचा विकास यावर भर देणारा सिद्धांत मांडतो. तुझ्या परिस्थितीचा सक्रिय अर्थ लावून अनुभव घेऊन प्रसंग हाताळणे किंवा कृती करणे. पीयाजे याचा भर ज्ञान बाहेरून नाही ,तर आतमधून नाही तर मनाने लावलेल्या अर्थातून येते यावर आहे .
मुलांच्या विकासाची सुरुवात ही त्याच्या गर्भावस्थेपासून होते. विषयाकडे वळताना बाळाची वाढ आणि विकासाला, मुख्यतः मेंदूची रचना आणि त्याचा विकास जबाबदार असतात . त्याकडे बघताना गर्भाअवस्थेतील थ्री ट्रायमिस्टरस मधून होणारा मेंदूचा विकास थोडक्यात बघूया.

* गर्भावस्थेतील पहिले तीन महिने :

First 2 weeks :पहिल्या दोन आठवड्यांमध्ये गर्भामध्ये मेंदूची निर्मिती सुरू होते . त्यावेळी पेशींची वाढ ही गुणाकार पद्धतीने होते . हा विशिष्ट पेशींचा थर हळूहळू स्वतःभोवतीच गुंडाळला जाऊन त्याला नळीचा आकार प्राप्त होतो ,आणि चौथ्या आठवड्यात हीच नलिका कडेकडेने बंद होत जाते आणि “न्यूरल ट्यूब ” ची निर्मिती होते.

After 4 weeks onwards: न्यूरल ट्यूब आकार बदलत राहते आणि त्यापासूनच पुढे फॉर्ब्रेन, हिंड ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड बनतो .

After 7 weeks : चेतापेशी आणि पेशींचे जोड synapse निर्मिती होते आणि गर्भाची पहिली हालचाल आईला जाणवत नाही ,पण MRI किंवा सोनोग्राफी मध्ये ही येणार आहे आणि त्यामुळे परत मेंदूला चालना मिळून “सेन्सर इनपुट्स” मुळे गर्भाच्या वाढीला मदत मिळते.

दोन महिन्याच्या गर्भाचा पूर्ण मेंदूचा आकार अस्तित्वात असतो. रचना पूर्ण असते.फक्त आकार छोटा असतो.

* सेकंड ट्रायमिस्टरस : या काळात मेंदू चे उभार ,खाचा दिसू लागतात आणि सिनाप्सिस वर हे चरबी युक्त घटकांचे आवरण निर्माण होते. (मायलिंग शीटस्) ते माहितीचे जलद प्रोसेसिंग होण्यासाठी मदत होते.
* थर्ड ट्रायमिस्टरस : आता सेरेब्रल कोरटेक्स चे काम सुरू होऊन गर्भाचा श्वासोछवास , बाह्य उद्दीपनांना प्रतिसाद देणे आणि गर्भाला करता येण्यासाठी सगळ्या क्रिया करण्यासाठी मदत होते.
* आपण बघू या की व्यक्ती शिकते कशी ? त्यात ब्रेनचा काय सहभाग असतो ?

प्रत्येक मनुष्य प्राणी ,त्यांचे अवयव समान असतो, पण तरीही प्रत्येकामध्ये काही एक फरक असतो तो कशामुळे तर फक्त मेंदूतील न्यूरोन्समुळे ! प्रत्येक ऍक्टिव्हिटी साठी मेंदूमध्ये वेगळा एरिया किंवा केंद्र असतं . डोक्याला इलेक्ट्रोड्स लावून जर आपण बघितलं तर कोणत्या वेळेला कोणत्या केंद्र कार्यान्वित होतो हे आपल्या लक्षात येतं उदाहरणार्थ स्पीच किंवा बोलणं यासाठी ब्रॉका केंद्र . मेमरी साठी वेगळं किंवा आपण नीट उभा राहू शकतो यासाठी संतुलन ठेवणार केंद्र वेगळं. आणि आपल्याला अगदी नकळत अशा सगळ्या केंद्रांचं काम सुरू असतं.

आपण आजूबाजूच्या परिसरातून नेहमी काहीतरी नवीन गोष्ट ,एखादे कौशल्य किंवा कुठलही वाचन करतो. अशावेळी आपलं लर्निंग करणारच केंद्र ऍक्टिव्हेट झालेलं असतं .ते कसं ?

उदाहरणार्थ आपल्याला कुठली पण एक माहिती मिळालेली आहे किंवा कुठली पण एक व्यक्ती भेटली आहे तर आपण त्या संबंधी निश्चितपणे काहीतरी विचार करत असतो, तिच्याविषयी अनालिसिस करत असतो की ही व्यक्ती कुठून आली असेल ? का आली असेल ? नेमकं काय सांगते आहे ? वगैरे काहीही आकलन न होता किंवा विश्लेषण न करता आपण त्यावर 100% विश्वास ठेवत नाही.

कोणीतरी काहीतरी सांगताय म्हणजे स्पीच प्रोडक्शन होत आहे आणि आपण ते ऐकतो आहे म्हणजे लँग्वेजचे केंद्र ऍक्टिव्हेट झालेले आहे . पण अशावेळी नेहमी करता ते इतकच सुसंगत आणि सुसूत्र होईलच असं नाही , कारण त्यामध्ये अडथळा येतो . हा अडथळा येतो काही विचारांनी ! जसं की माझा अभ्यास राहिलेला आहे माझी उद्या परीक्षा आहे ,आणि त्यामुळे या विचारातून ” इमोशनल स्ट्रेस ” निर्माण होतो. आकलनाचं काम थांबून ते इमोशनल केंद्राकडे दिल्या जात.

तर अशी भाषा ,स्मरण ,भावना यांच्या केंद्रांमध्ये न्यूरोंस नावाच्या पेशी असतात आणि कुठलाही नवीन वाचन किंवा कुठलंही नवीन शिक्षण घेतलं ,किंवा स्किल शिकलं की दोन न्यूरोंस जोडण्याचं काम अखंड सुरू असतं. प्रत्येक अनुभवांमधून की जोडणी सुरू असते. कुठल्याही वाचलेल्या गोष्टींमध्ये पूर्वी काय वाचलं हे पहिल्यांदा स्टीम्युलेट होतं आणि नंतर नवीन माहिती त्यामध्ये ऍड होऊन परत नवीन न्यूयॉर्कची साखळी निर्माण होते . ही साखळी तयार होणं म्हणजेच शिक्षण . अगदी जन्मल्यापासून ही साखळी तयार होण्याला सुरुवात होते .जसे की बाळ जन्माला बरोबर पहिल्यांदा प्रकाश ,नंतर गरम पाणी ,हात ,मऊ कपडे यांचा स्पर्श होऊन त्याची जाणीव हे सगळे नवीन अनुभव म्हणून तो स्वीकारतो .या न्यूरोन्सच्या जोडणीला ” सिनॅप्स ” म्हणतात आणि त्या सिनेप्स वर नंतर एक आवरण चढत जातं त्याला “मायनिंग शिटस “असे म्हणतात. अनेक विषयांचे कितीतरी मायनिंग शिटस आपल्या ट्रेनमध्ये जमा होत असतात. आणि जेव्हा पुन्हा पुन्हा आपण एखाद्या गोष्टीची किंवा अभ्यासाची रिविजन करतो, सराव करतो ,त्यावेळेला हे मायनिंग शीट जमा होतात, आपल्या आठवणी पक्क्या होत जातात. म्हणजेच आपला अभ्यास पक्का होत जातो. सराव आणि आहारावर हे थर अवलंबून असतं. सराव कमी पडला किंवा आहारातले प्रोटीन्स कमी असतील प्रोटीन्स ने बनलेल्या मायनिंगशीटस वर परिणाम होतो. आणि मेमरी हा भावनांशी रिलेटेड असतात मग त्या पॉझिटिव्ह असो. म्हणूनच अभ्यास करताना कुठल्याही प्रकारे भावभावनाशी जोडून किंवा कल्पनेतल्या पात्रांचे संवाद योजून अभ्यास केल्यास तो लक्षात राहतो.

या मेंदूतल्या केंद्रांचा आणि बाळ जन्माला आल्यानंतर त्याचा होणारा विकासाचा काही एक संबंध असतो . तो आपण बघूया पुढच्या भागात !

Post a Comment

0 Comments