मेंदूचे कोडे आणि बाळकडू - भाग 2

 

मेंदूचे कोडे आणि बाळकडू


Puzzles of the Brain and Child's World Latest news 31-03-23

मानवी मेंदूचे विभागणी चेतापेशी आणि पूरक पेशी यांच्यामध्ये केली जाते. चेतापेशींचे काम संदेश स्वीकारणे आणि पोहोचवणे हे असते जन्माच्या वेळीच त्यांची संख्या वीस बिलियन एवढी असून ती नेहमी करता कायम असते. या वरील मायलीन मुळे संदेशवहन प्रभावी होते. त्याचप्रमाणे पूरक पेशी यांची वाढ मात्र जन्मानंतर जास्त होते पोषण आणि संरक्षण हे यांचं काम असतं त्याचप्रमाणे माईलीन आवरणाच्या निर्मितीला मदत करण्याचं काम या करतात.(Puzzles of the Brain and Child’s World)

अस्थी, स्नायू आणि दात हे सुरुवातीला अत्यंत मऊ आणि नाजूक स्वरूपात असतात मध्ये कॅल्शियम साठलेलं असतं नंतर त्याचं रूपांतर कार्टीलेज मध्ये होऊन हाडे निर्मिती होते . सुरवा तीला कमजोर असलेले स्नायू हालचालींबरोबरच पाणी आणि प्रथिनांमुळे मजबूत होतात.

बालकाच्या विविध अवस्थांमधून मेंदू विकास आणि त्यामुळे होणाऱ्या इतर विकासाच्या अवस्था आपण बघूया.
त्यापूर्वी वाढ आणि विकासातला फरक आपण बघूया !

# अर्जुनच्या पायांची हाडं स्नायू आता मोठी आणि बळकट झाली. किंवा अनुपम ला आय हॅन्ड कॉर्डिनेशनच्या हालचाली आता चांगल्या होतात. हे दोन्हीही संख्यात्मक बदल आहे आणि संख्यात्मक बदल म्हणजे होणारी वाढ !

# अर्जुन चांगला पळू लागला किंवा अनुपमला आता मण्यांची माळ चांगली ओवता येते. यामध्ये जैविक परिस्थितीजन्य घटक किंवा संरचने , विचारात, वर्तनात काळानुरूप बदल झालेले आहे . कौशल्यात वाढ झालेली आहे. कौशल्य म्हणजे विकास !

१) अर्भकावस्था : (जन्मापासून दोन आठवड्यांपर्यंत ही अवस्था असते. उत्तरार्ध २ आठवडे ते १८ महिने.)आकारमान ,शरीररचना ,प्रमाणबद्धता कार्यपद्धती या कशाचाच या अवस्थेमध्ये संबंध नसतो.

जन्माच्या वेदनांचा कठीण काळ सहन करत अक्षरशः एक्सरसाइज करत बाहेर आलेला बाळ बाहेरच्या वातावरणाला तोंड देत समायोजन करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी त्याच्या सेंसरी अबिलिटीज विकसित असतात .याचा विचार करताना डोळ्यातल्या सेन्स सेल्स पूर्णत्वाला गेलेल्या नसतात . हलणाऱ्या वस्तूंचा मागोवा घ्यायला बरेच तास असतात. पहिल्या आठवड्यात जवळच्या वस्तूंवर नजर स्थिर होत.

बाळ गर्भात असल्यापासून ऐकतच असते. पहिल्या दोन महिन्यात सगळ्यात जास्त ऐकते, माणसं प्राणी पक्षी यांचे आवाज ऐकते, त्याच्या मेंदूला रडणे या गोष्टीशी संबंधित भाग जास्त सक्रिय असतो. रडूनच मागतात .वस्तूपेक्षा चेहरे ,आईचा आवाज, घरातल्यांचा आवाज ,स्तोत्रांचा आवाज हे परिचयाचे असतात .तीन महिन्याचे बाळ याच्या हिपोकॅम्पस या भागाची लक्षणीय वाढ झालेली असते, तशीच लिम्बिक सिस्टीम या स्मृतीशी संबंधित गोष्टींची पण वाढ झालेल्या असल्यामुळे ओळख पटायला सुरुवात होते.

या वर्षात मेंदूच्या फ्रंटल व टेम्पोरल लोब मध्ये असणारी भाषेची सर्किट एकत्र होतात पहिल्या काही महिन्यातच बोलण्याचा प्रयत्न सुरू होतो घरातील आणि दुसरी एखादी भाषा पटकन येते दोन-तीन भाषांमध्ये जर संवाद साधला तर त्या येऊ शकतात.

स्मेल घेण्यास सेन्स चांगला डेव्हलप झालेला असतो. जन्मतः किंवा काही दिवसातच दोन सुवासांमधील फरक तो ओळखतो, एवढच नव्हे, तर नंतर नावडता स्मेल जर असेल तर तो मान फिरवून नकार दर्शवितो. जन्मतः फक्त गोड चव आवडत असते. खारट आंबट तुरट नाही.

वाढीच्या अवस्थेतले चालण्यापूर्वीची महत्त्वाच्या अवस्था मान वळवून आवडत्या वस्तूकडे बघणे, टक लावून बघणे, मुठीत पकडण्याचा प्रयत्न करणे, नंतर सरकणे ,गुडघ्यावर येण्याचा प्रयत्न करणे हे जर पुरेशी मोकळी जागा हालचालीसाठी दिल्या गेली तर लवकर ही कौशल्य हस्तगत केल्या जातात.

२) बेबी हूड ,शैशवावस्था : १८ म. ते तीन वर्ष ही अवस्था असते. बालके बऱ्यापैकी स्वतंत्र होऊन संवाद साधू शकतात. वर्तनासंबंधीचे पॅटर्न करण्यासाठी आवश्यक असलेली भावना अभीव्यक्ति ची पायाभरणी इथे होते.
मोटर स्किल्स म्हणजे हातानी करायच्या गोष्टींमधील कौशल्य ,खा, कपडे घालणे, तयार होणे, हे स्वतःचे स्वतः करू शकतात पण त्यात सफाई अजिबात नसते हात बरबटून खाल्ल्या जाते.

यावेळी झाकणं लावणे डबे उघडणे बॉलची फेकाफेकी रंग कांड्यांचा वापर पुस्तकाची पान उलटी पलटी करणे , चार-पाच ठोकळ्यांची रचना करणे ,मणी ओवणे ,कागद कापणे पायऱ्या रांगत रंगत किंवा सरकत चढणे यासारख्या हालचाली करण्याची सुरुवात होते. तो स्वतःला इजा होऊ नये म्हणून त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज असते.

दुसऱ्या वर्षी भाषा या गोष्टीशी संबंधित सगळ्या भागांमध्ये सिनेप्स तयार होऊन भाषा शिकण्याची क्षमता अत्युच्च पातळीला जाते त्याला शास्त्रीय भाषेत व्होक्याबिलरी एक्सप्लोजन म्हणतात. स्व संबंधी जाणीव निर्माण झालेली असते त्यामुळे स्वयंमने असे केले स्वयंमने खाऊ खाल्ला अशी भाषा वापरली जाते.

भावना अभिव्यक्ती अनिश्चित असते कोणत्याही गोष्टीने त्या उफाळतात काही ठराविक उद्दीपक त्यासाठी असतात उदाहरणार्थ हवी असलेली वस्तू दिली नाही की राग येणे मग त्यासाठी अंग झोकू न देणे लाथा मारणे यासारख्या गोष्टी घडतात.
संवाद : बोलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली असली तरी तीन महिने ते अठरा महिने हे संभाषण बरेच वेळा फक्त चेहऱ्यावरचे हावभाव आवाजातील चढ-उतार यावरूनच त्यांना अर्थबोध होतो. वर्षानंतर खरे अर्थ कळायला लागतात. सुरुवातीला फक्त दोन दोन शब्द आणि नंतर दीड वर्षांनंतर अख्खा एक वाक्य बोलायला सुरुवात होते. ओळखीचा हसू मात्र सहा आठवड्यामध्येच यायला सुरुवात होते.

३) अर्ली चाईल्डहूड साधारण तीन वर्ष ते सहा वर्ष समजले जाते. या अवस्थेतील बालकांना बऱ्यापैकी समज आलेली असते. शाळेत जायचं वय जवळ आलेलं असतं .त्या दृष्टीने मिसळून राहण्याची समज आलेली असते ,तशी तडजोड जमायला लागलेली असते .म्हणूनच याला “प्रि गॅंग एज” असं म्हणतात . याच वयाला संशोधकांनी वेगवेगळ्या नावांनी संबोधीलेलं आहे. आजूबाजूचे लोक वातावरण याच्यावर नियंत्रण येऊन ते लोक कसे वागतात ? काय करतात? हे शोधणं सुरू झालेलं असतं म्हणूनच याला “एक्सप्लॉयलेटरी एज “असं देखील म्हणतात. त्याचप्रमाणे याच वयामध्ये प्रत्येक गोष्टीबद्दल जिज्ञासा वाढीस लागलेली असल्यामुळे याला” क्वश्चनिंग एज” असं म्हणतात. छोट्या मोठ्या गोष्टी करणं ,नवनिर्मिती करणं, असं बरंच काही जमायला लागलेलं असतं. त्याच्यामुळे” क्रिएटिव्ह एज” असंही नामकरण याला झालेलं आहे.

तीन वर्षापर्यंत प्री फ्रंटल कोर्टेक्स या भागातील सिनेप्सची घनता तीव्र वेगाने वाढते . मेंदूचा हा भाग इतर भागांशी असलेल्या जोडण्या स्ट्रॉंग करतो .आधीच्या घटनांचे आत्ताच्या घटनांशी असलेले रिलेशन्स कळतात .त्यामुळे कार्य कारण भाव ,परिणाम नीट संबंध समजतात.

@ त्यात एका महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करावा लागतो तो म्हणजे मॅटरनल केअर चा जर अभाव असेल म्हणजे काही कारणांनी मुल आईपासून दूर असेल तर त्याचा त्याच्या विकासावर खूप जास्त प्रमाणात परिणाम होतो आणि याची काळजी केअर टेकर्सना घ्यावी लागते. कारण बाळ फक्त दुधा पुरता आईवर अवलंबून नसून सुरक्षितता सुखद उबदारपणा यासाठी त्याला आईची गरज असते. 18 महिने ते दोन वर्षाचे बाळ हे अतिशय पझेसिव्ह, सेल्फिश, आणि सहनशीलता अजिबात नसणारे असते. यापूर्वीच्या काळात आईची माया मिळालेली नसेल तर ते तीन भावना दर्शवितात.

प्रोटेस्ट म्हणजे विरोध करणं निषेध दर्शना किंवा हरकत घेणं. अशावेळी ही मुलं सैरभैर शोधत फिरतात किंवा सारखा पाळणा किंवा वस्तू जोरजोरात हलवतात.

तर दुसरी भावना म्हणजे निराशा किंवा आशा सोडणे अशी भावना दर्शवणारा मुल भावना शून्य बनवून थांबून थांबून रडतं. दुसरा कोणी काळजी घ्यायला लागलं तर जास्त सेल्फिश होतं खाऊ खेळणी यांच्यामध्येच सुख शोधत .

# वरील मुख्य बदलांबरोबरच लहान मुले त्यांच्या नियंत्रित व अनियंत्रित हालचाली त्यानुसार त्यांना प्राप्त होणारी कारक कौशल्य ही प्रत्येक महिन्याला बदलत असतात. अनुसरून ते अनेक कृती करत असतात .त्यातून अनेक कौशल्य मिळवत असतात. कळत नकळत वस्तूबरोबर वेगवेगळे खेळ खेळत असतात आणि पंचेंद्रांनी विविध अनुभव घेत असतात. सामाजिक जाणीव निर्माण होत असते वर्गीकरण करू शकतात, प्रश्नांची सोडवणूक करायला शिकतात, भाषा समृद्ध होत जाऊन शब्दसंच वाढतो ,आपोआप संवाद कौशल्य वाढते. भावनांचा विकास होतो.

हे सगळे बदल होणारी वाढ आणि विकास नकळत निसर्गतः होतच राहतात. यावर नीट लक्ष ठेवून ते होतात आहे की नाही हे निरीक्षण करणं आणि ते जास्तीत जास्त चांगले होण्यासाठी आणखीन काही ऍक्टिव्हिटीज त्यांना करायला लावणार हे आपल्याला करायचं असतं.

सुरुवातीला अशी काही कारक कौशल्य ,प्रश्नांची ,सोडवणूक, संवाद कौशल्य, भाषा विकास कसा होतो हा हे थोडक्यात पाहून मग आपण काही ऍक्टिव्हिटी ची माहिती करून घेऊ.

  •  सुरुवातीला बाळाच्या आयुष्यातील हालचाली संबंधित आजूबाजूच्या जगाची ओळख करून घेण्यासाठी आणि स्वतःची क्षमताची चाचणी करण्यासाठी, पण पूर्णपणे कोणत्याही उद्दीपकाला निरहेतुक प्रतिक्रिया देऊन होत असते. मेंदूच्या वरच्या भागात त्या मनाने नियंत्रित हालचाली असतात तर खालच्या भागांमध्ये तेवढ्या नियंत्रित हालचाली नसतात, त्यामुळेच लहान मुलं सारखी पायांनी सायकल चालवत राहतात. या अशा प्रतीक्षिप्त क्रियामार्फतच न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंट मोजत असतात.
  • जन्म ते एक महिना पर्यंत अशा सहज हालचाली होतात आणि त्याच्यानंतर चार महिन्यापर्यंत साध्या हालचाली पण परत परत वर्तुळाकार पद्धतीने होतात यात बरेसा दुय्यम वर्तुळाकार म्हणजे स्वतःच्या शरीराकडून बाहेर आणि परत स्वतःकडे अशा होताना दिसतात. आठ महिन्याच्या हालचाली या आजूबाजूच्या वस्तूंच्या संबंधित होतात. वस्तू घेणे त्यासाठी पुढे सरकणे, मुठीत पकडणे, चिमटीत पकडणे. इतर वर्षानंतर आत्मसात केलेल्या या छोट्या कृतींचा वापर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी केली जाते .त्यासाठी अनेक मार्गांचा वापर केला जातो. ट्रायल अँड एरर मार्गाने हे प्रयत्न केले जातात .ही कुठलीही वस्तू मिळवण्याच्या हेतूपेक्षा एक शिकण्यातलाच प्रोसेस चा भाग असतो.
  • 18 ते 24 महिने या अवस्थेमध्ये समस्या सोडवणे किंवा प्रश्न सोडवणे जमू लागते. गाडी चालवताना किंवा तीन चाकी सायकल चालवताना मध्ये जर दगड आला तर तो उचल ून बाजूला सरकवला जातो किंवा अनुकरणात शिक्षण घेतलं जातं म्हणजे आपल्या बाहुलीला थोपटने, दूध पाहिजे या क्रिया केल्या जातात.

वेळेची समज आलेली असते –त्यावेळी रडता रडता थांबून कोणी आपल्याला बघताय की नाही हे बघितलं जातं . तर अंतराचा अंदाज देखील आलेला असतो त्यामुळे खुर्ची खाली गेलेला बॉल शोधण्याचा प्रयत्न होतो. कार्य कारण भाव वापरण्यासाठी खिडकीतून वस्तू खाली टाकून त्याचं काय होतं हे वाकून बघितलं जातं.

खेळण्याच्या पद्धती या वस्तूंबरोबरचे शोधक खेळ म्हणजेच एक्सप्लोर्रेटरी प्ले विथ ऑब्जेक्ट हे वेगवेगळ्या महिन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे खेळले जातात वर्षापूर्वी मूल हे पंचंद्रियांच्या मार्फत खेळत असते तर विसाव्या महिन्यापर्यंत सामाजिक आणि काल्पनिक पद्धतीने ते खेळले जातात.

यमन या रंगीबेरंगी रिंग्स खाली वर करून बघतो आपटतो, चावून बघतो, नाकाला लावून बघतो अंगावर घासतो पूर्ण पंचेंद्रियांचा उपयोग करून खेळतो. त्याच्या रंगांचे त्याला काहीही देणे घेणे नसते. त्या ऐवजी साक्षी दीड ते दोन वर्षाची आहे. ती उलटेपालटे करून त्याचे रंग बघते. नंतर ती स्वतःच्या हातात घालते आणि नंतर बाहुलीच्या हातात घालून पाहते. जे सामाजिक आणि काल्पनिक उपयोग तिने केलेला आहे.

वर्गीकरण क्षमता सुद्धा त्यांना आलेली असते. आकार रंग आणि नंतर छोटा मोठा याप्रमाणे ते वस्तूचे वर्गीकरण करतात.

  1. अशा पर्यंत भाषेचा विकास भरपूर झालेला असतो आणि त्यामुळे गुंतागुंतीच्या सूचना अमलात आणू शकतो .त्या पुढची क्षमता म्हणजे अनुकरणातून खेळणे किंवा प्रतीकात्मक खेळणे म्हणजे गाडी गाडी खेळणे ,शाळा शाळा खेळणे. सुरू होते.
  2. भावनिक विकास. बरेचदा लहान मूल आईबरोबर बुवा कुक ! चा खेळ खेळतो. अशा वेळेला भाषेची वेगळ्या स्वरूपात देवाण-घेवाण होते. भावना शरीरावर परिणाम करत असतात त्या व्यक्त करणे आणि अनुभवणे त्याचप्रमाणे परस्पर आंतरक्रिया म्हणजे लोकांचा प्रेमाची देवाण-घेवाण करणे या गोष्टी येऊ लागतात इतरांच्या भावना विचार समजून घेऊन संवाद साधने हळूहळू जमू लागते.

भावनिक विकास नीट व्हावा म्हणून मुलांची चिडक्या स्वरात तिरकस बोलू नये तर हळूहळू आणि काळजी युक्त स्वरांमध्ये बोलणं जवळ घेणं थोपटन कुशीत घेणे रडण्याला लवकर प्रतिसाद देणे मी रहे तू प्रेम देणे गप्पागोष्टी करण आणि आपण त्याच्याबरोबर वेळ घालवतो हे त्याला कळू देणे त्यातून स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन देणे वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित करणे यातून भावनिक विकास साधता येतो. महिन्याच्या सुरुवातीला कोणत्याही मुलाला विलगतेची चिंता भेडसावत असते ही तात्पुरती अवस्था असून त्याला जर पुरेसा वेळ दिला आणि इतर लोकांमध्ये मिसळण्याची त्या वेळेला जबरदस्ती केली नाही चांगल्या वर्तनाला शाबासकी दिली सकारात्मक सूचना दिल्या तर भावनिक परिपक्वता लवकर येते.

भावनिक परिपक्वता :

  • नऊ महिन्याच्या मुलाला जर आईने थांब मी स्वयंपाक घरात जाऊन खाऊ आणून देते असं म्हटलं तरी ते रडतच राहतं परंतु अडीच वर्षाचा मूल मात्र याला प्रतिसाद देतो आणि रडणं थांबवतो कारण त्यांचा भाषिक कौशल्याचा विकास झालेला असतो आणि अमूर्त संकल्पनांमधील प्रगती पूर्ण झालेली असते. म्हणजे त्यावेळेला आई जरी तिथे नाही तरीही ती थोड्या वेळानी तिथे येणार आहे म्हणून त्याला मूर्त स्वरूप देऊन तो आई असल्याची कृती कल्पना करू शकतो.

  • संकल्पना काल्पनिक खेळातून व्यक्त होते अर्ध्या कांड्या बाहुलीला खेळायला देणे किंवा स्वतःच्या रिकाम्या कपातून एक घोट बाहुलीला देणे.

  • तिसऱ्या ते चौथ्या वर्षापर्यंत अयोग्य वर्तमान बद्दल लाज वाटते लहान भावंडाची खोडी केल्यानंतर मूल अस्वस्थ होतं. प्रमाणे भावना व्यक्त करताना तारतम्य ठेवणं समजतं म्हणजे मित्रांशी ज्या पद्धतीने भांडेल त्या पद्धतीने शाळेच्या ताईंबरोबर बोलणार नाही.

  • पाच ते सहा वर्ष या वयोगटातील भावनांमागील कारणे ओळखते पण त्याची कारण बाह्य घटकांमध्ये शोधते जसे की मित्र रागावला कारण त्याला अमुक एक गोष्ट आवडली नाही. आणि जिव्हाळा ,राग, दुःख, द्वेष ,मत्सर ,भीती, जिज्ञासा आणि आनंद अशा काही भावनांची त्यांना जाणीव होते.

  • पहिली सहा वर्ष म्हणूनच बाळाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असतात वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून या सगळ्या विकासाला आणि वाढीला आपण मदत करू शकतो.

Post a Comment

0 Comments