IPL 2023 : आयपीएल स्पर्धेत केदार जाधव ने आतापर्यंत एकूण 93 सामने खेळले आहेत. यात त्याने 1196 धावा केल्या आहे. तर अर्धशतकं झळकावली आहेत. पण आता समालोचन करत असताना त्याला आरसीबीने संघात घेतलं आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात केदार जाधवची सरप्राईज एंट्री झाली आहे. समालोचन करणाऱ्या केदार जाधवला संघात कसं स्थान मिळालं असा प्रश्न अनेकांना पडला होता.
आरसीबीकडून खेळणारा डेव्हिड विली दुखापतग्रस्त झाल्याने स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी केदार जाधवला संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे निवड होण्यापूर्वी केदार जाधव जिओ सिनेमावर मराठीत समालोचन करत होता.
आरसीबी संघात थेट स्थान मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत असताना खुद्द केदार जाधवने याबाबत सांगितलं आहे. संघात कशी निवड झाली याबाबत खुलासा केला आहे.
आरसीबी संघात निवड झाल्याने केदार जाधवने आनंद व्यक्त केला आहे. संघात मला घेतल्याने मी सर्व खेळाडू आणि फ्रेंचाईसीचे आभार मानतो.मी संघासाठी माझं सर्वस्व पणाला लावून कामगिरी करेन.
केदार जाधव शेवटची आयपीएल स्पर्धा 2021 मध्ये खेळला होता. सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना त्याने 6 सामन्यात फक्त 55 धावा केल्या. 2016 आणि 2017 मध्ये आरसीबीसाठी 17 सामने खेळला. यात त्याने 23.92 च्या सरासरीने 311 धावा केल्या.
केदार जाधव आतापर्यंत आयपीएलमध्ये 93 सामने खेळला आहे. यात त्याने 1196 धावा केल्या आहेत. तसेच 4 अर्धशतकं झळकावली आहेत. आरसीबीने 38 वर्षीय केदार जाधवची निवड केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
0 Comments