तांबाटी गावकऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश



कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील तांबाटीवाडी या गावातील तरुण, महिला आणि ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. युवासेना तालुका समन्वयक अमोल बलकवडे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटात प्रवेश केलेले तरुणही यावेळी स्वगृही परतले. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे यांनी हीच खरी शिवसेना आहे म्हणून गावकरी खऱ्या शिवसेनेकडे आले असे म्हटले.

तांबाटी गावातील विलास बलकवडे, अल्पेश बलकवडे, सचिन बलकवडे, मंगेश बलकवडे, राजेश बलकवडे, रुपेश बलकवडे, सुयोग सावंत, सुरज सावंत, जनार्दन सावंत, चंद्रकांत सावंत, कल्पेश सावंत, उदय चव्हाण, प्रफुल्ल चव्हाण, संजय कदम, ओम कदम यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी तालुका समन्वयक अमोल बलकवडे यांनी मनोगत व्यक्त करतांना आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून कर्जत मतदार संघातील पाण्याचा आणि रस्त्याचा प्रश्न सुटल्याचे सांगितले. आमदार थोरवे यांनी आतापर्यंत दिलेला शब्द पूर्ण केला. या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, उपसभापती मनोहर थोरवे, तालुका प्रमुख संदेश पाटील, युवासेना तालुका प्रमुख रोहित विचारे, वडगाव जिल्हापरीषद संपर्क प्रमुख अरुणा सावंत, उपतालुका प्रमुख संतोष मुंढे, सल्लागार चंद्रकांत फावडे, विकास मुंढे आदि मान्यवर ही उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments