रिफायनरीसंदर्भात उदय सामंतांची विनायक राऊतांबरोबर बैठक; घेतले ‘हे’ सहा महत्त्वाचे निर्णय, वाचा सविस्तर
या बैठकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादीचे नेते अजित यशवंतरावही उपस्थित होते. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असल्याचे आज उदय सामंतांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केले.
Barsu Refinery Project : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी बारसू येथे माती परिक्षण सुरू झाले असून पुढील आठ ते दहा दिवसांत हे परिक्षण संपेल. मात्र, हे परिक्षण सुरू होताच येथील ग्रामस्थांनी परिक्षणस्थळी आंदोलन पुकारले.
बारसू येथे रिफानयरी प्रकल्प होऊ नये याकरता ग्रामस्थांसह राजकीय नेत्यांनीही कडाडून विरोध केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोकणात गंभीर वातावरण निर्माण झाले असल्याने यावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत आज बैठक घेतली. या बैठकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादीचे नेते अजित यशवंतरावही उपस्थित होते. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असल्याचे आज उदय सामंतांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केले.
0 Comments