राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कोण ? अजित पवार, सुप्रिया सुळे की…; पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक, निर्णयाकडे देशाचं लक्ष

         अध्यक्षपदी शरद पवारच हवेत; राष्ट्रवादीचे नेते-कार्यकर्ते आक्रमक, मुंबईतील कार्यालय परिसर घोषणांनी दुमदुमला. 


महाराष्ट्र: राष्ट्रवादी पक्ष, राष्ट्रवादीचं अध्यक्षपद आणि राष्ट्रवादीचे नेते-पदाधिकारी यांची मागणी-आंदोलनं… या गोष्टी मागच्या चार दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत आहेत. अशातच आज या सगळ्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडतेय. या बैठकीकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादीच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात निवड समितीची बैठक पार पडतेय. 
या बैठकीत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत चर्चा होणार आहे. 
त्यामुळे यबैठकीत नेमका काय निर्णय होणार हे पाहणं महत्वाचं असेल.

बैठकीतील दोन प्रस्ताव

प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत दोन प्रस्ताव मांडले आहेत. पहिला म्हणजे शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या बैठकीत मांडण्यात आला आहे. तर शरद पवार पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष व्हावेत, असा दुसरा प्रस्ताव प्रफुल्ल पटेल यांनी मांडला आहे.

अध्यक्षपदाबाबत काय निर्णय होऊ शकतो?

शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यानंतर एकच चर्चा सुरू झाली की राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार? कार्यकर्ते जरी शरद पवार यांच्या नावासाठी आग्रही असले तरी आता अध्यक्षपदी कुणाची निवड होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे यांचं नाव आघाडी असल्याची माहिती आहे. पण जर सुप्रिया सुळे यांच्या नावाची निवड झाली नाही तर शरद पवार हे प्रमुख मार्गदर्शक राहतील आणि सुप्रिया सुळे यांना कार्यध्यक्ष केलं जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी

मुंबईतील प्रदेश कार्यलयाबाहेर राष्ट्रवादीचे हजारो नेते आणि कार्यकर्ते जमले आहेत. हे सगळे लोक शरद पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आहेत. आम्हाला केवळ शरद पवार हेच अध्यक्ष हवे आहेत, असं या नेत्या आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

छगन भुजबळ यांची भूमिका

            शरद पवार यांनी राजीनामा दिल्यापासून राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या नावावर ठाम आहेत. शरज पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असावेत, अशी ते मागणी करत आहेत. आजही छगन भुजबळ यांनी हीच भूमिका मांडली. पवारसाहेबांचा राजीनामा नामंजूर करणार आणि त्यांना सांगणार तुम्हीच अध्यक्ष राहायचं, असं छगन भुजबळ म्हणालेत.


Post a Comment

0 Comments