काय आहेत साष्टांग नमस्काराचे फायदे? पंतप्रधानांनी घातला साष्टांग नमस्कार!

             नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर कोणतीही लाज न बाळगता अनेक लोकांच्या घोळक्यात जवळ जवळ दोन वेळा साष्टांग नमस्कार केला आहे. पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांना संसदेचं कामकाज पाहण्यासाठी संसद भवनात पोहचले तेव्हा त्यांनी संसद भवनाच्या पाय-यांना दंडवत प्रणाम केला. तसेच आता भगवान श्रीरामांच्या भुमिपूजनाच्या कार्यक्रमा दिवशी भगवान श्रीरामांना मनोभावे वंदन करण्यासाठी मंदिराच्या पाय-यांवर पूर्णपणे जमीनीवर झोपून साष्टांग नमस्कार घातला. खरं तर अध्यात्मिकतेकडे वळताना केलेल्या प्रत्येक गोष्टींमागे एक तरी शारीरिक आणि मानसिक फायदा लपलेला असतो.

जसं की हिंदू धर्मात कपाळावर जो गंध किंवा कुंकू लावले जाते. कपाळावर कुंकू अथवा गंध लावताना आपला योग विज्ञानाच्या दृष्टीने कुंकवाचा संबंध थेट आपल्या मनाशी जोडला गेलेला आहे. आज्ञा चक्र मनाला नियंत्रित करत असते. जेव्हा आज्ञा चक्रावर दबाव पडतो तेव्हा मन एकाग्र होते. कुंकू लावतांना भ्रूमध्य आणि आज्ञाचक्रावर दाब दिला जातो आणि तेथील बिंदू दाबले जाऊन चेहर्‍याच्या स्नायूंना रक्तपुरवठा चांगला होतो आणि मन शांत रहाते. चला तर मग आज आपण प्रणाम आणि साष्टांग नमस्काराच्या आरोग्यास होणा-या फायद्यांविषयी एक्सपर्ट्सकडून जाणून घेऊया.

भावनेचा प्रश्न

भावनेचा प्रश्न

सनातनी धर्मात जेव्हा आपण कोणासमोर साष्टांग किंवा दंडवत नमस्कार घालतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की आपण आपलं सर्वस्व समोरील गोष्टीप्रती अर्पित केलं आहे. तुम्ही जे काही कार्य कराल ते त्याच्या आज्ञेनुसारच कराल. साधारण अशी मुद्रा किंवा असा साष्टांग नमस्कार हा आपण मंदिर किंवा तीर्थस्थळी घालतो. तसंच ब-याचदा आपण गुरुजणांना वंदन करण्यासाठीही त्यांच्या चरणांवर साष्टांग नमस्कार घालतो. ही आपली परंपरा आणि भावनेशी जोडलेली गोष्ट आहे.

शारीरिक लाभ

शारीरिक लाभ

जे लोक शारीरिकरित्या अॅक्टिव असतात त्यांना या प्रकारची मुद्रा करण्यात कोणतीच समस्या येत नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ६९ वर्षांचे झाले आहेत. त्यामुळे या वयात साष्टांग नमस्कार करणं मुश्किल होतं. कारण या वयात पोहचेपर्यंत आपले स्नायू आणि हाडांमधील लवचिकता कमी होत जाते. पण पंतप्रधान मोदी साष्टांग नमस्कार खूप सहजरित्या करतात कारण ते स्वत:ला शारीरिक आणि मानसिकरित्या खूपच सकारात्मक आणि सक्रिय ठेवण्याचा कायम प्रयत्न करतात. दिल्लीच्या विवेक विहार मध्ये असलेल्या 'गौतम स्कूल ऑफ योगा' येथील योग ट्रेनर आणि हेल्थ कोच हरेंद्र गौतम यांचे म्हणणे आहे की सनातन धर्मात पुजापाठ करताना केला जाणारा साष्टांग नमस्कार हा सुर्यनमस्कारातील अष्टांग नमस्कारातून घेतला गेला आहे. सर्वस्व अर्पण करण्याच्या भावनेने केलेल्या या नमस्कारास साष्टांग नमस्कार म्हटले जाते.

साष्टांग नमस्काराचे फायदे

साष्टांग नमस्काराचे फायदे

हरेंद्र गौतम सांगतात की साष्टांग नमस्कार करताना आपल्या शरीरातील ८ अवयव पृथ्वीला स्पर्श करतात. या स्थितीत आपले मन शांत असते आणि त्यामुळे आपण पृथ्वीची सकारात्मक उर्जा आकस्मित करु शकतो. तसेच या मुद्रेमुळे तणाव कमी करण्यास दोन प्रकारे मदत मिळते. पहिली तर ही की जेव्हा आपण देवाला समर्पित करण्यासाठी या मुद्रेत झोपतो तेव्हा सांसारिक दु:खातून मुक्ती मिळाल्याची भावना मनी येऊ लागते आणि मानसिक तणाव कमी होतो. दुसरी मदत ही की यामुळे शारीरिक मरगळ कमी होऊन शरीर हलकं वाटू लागतं.

या आजारांवर लाभकारी आहे साष्टांग नमस्कार

या आजारांवर लाभकारी आहे साष्टांग नमस्कार
  1. साष्टांग नमस्कार करताना पोटावर आवश्यक तो दबाव पडतो आणि पोटाचे स्नायू खेचले जातात. यामुळे मेटाबॉलिजम ठीक राहते.
  2. हरेंद्र गौतम यांच्या मते जे लोक नियमित न चुकता साष्टांग नमस्कार करतात त्यांना आपली रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास (मधुमेह) मदत मिळते.
  3. साष्टांग नमस्कार केल्याने आपल्यामध्ये धैर्य आणि संयम जागृत होतो. जो आपल्याला अनेक मानसिक आजारांपासून दूर ठेवतो.
  4. जे लोक सिटींग जॉबमध्ये असतात त्यांना ब-याचदा आपल्या पाठीच्या मणक्यात ताणल्यासारखं आणि खेचून घेतल्यासारखं होतं. पण अशा लोकांनी साष्टांग नमस्कार केल्यास त्यांचा पाठीचा कणी बळकट होऊन पाठीशी निगडीत सर्व समस्या दूर होतात.

साष्टांग नमस्काराचे सुक्ष्म लाभ

साष्टांग नमस्काराचे सुक्ष्म लाभ

जसं आम्ही आधीही सांगितले की हा नमस्कार करताना आपल्या शरीरातील ८ अंग हे पृथ्वीला स्पर्श करतात. यामध्ये आपले डोके, खांदा, हात, नाक, छाती, पोट, गुडघे आणि पायाचे अंगठ्यांचा समावेश असतो. जेव्हा आपले हे ७ अवयव एकसाथ पृथ्वी मातेला स्पर्शतात तेव्हा तिची सकारात्मकता आपल्यात येते. साष्टांग नमस्कारात पोट, छाती, खांदे यावर दाब पडल्याने अतिरिक्त चरबी देखील कमी होते.

Post a Comment

0 Comments