एखाद्या पार्टी किंवा कौटुंबिक समारंभासाठी तुम्हाला केवळ पाच दिवसांत वजन कमी (Weight Loss Tips) करायचे आहे का? यासाठी तुम्ही डाएट प्लान शोधत आहात का? तर चिंता करू नका यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. पोटावरील चरबी घटवणे थोडेसे कठीण काम आहे, पण काही ट्रिक्स आहेत ज्यामुळे तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. तुम्ही दिवसभरात काय खाता? किती वेळ व्यायाम करता? या सर्व गोष्टी वजन कमी (Weight Loss Diet) करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात.
7 दिवसांच्या वेट लॉस प्लानमध्ये (Weight Loss Plan) कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे, त्याबाबतची माहिती आम्ही टप्प्याटप्प्याने तुम्हाला या लेखाद्वारे देणार आहोत. योग्य पद्धतीने सर्व नियमांचं पालन केलं तरच वजन (Weight) कमी होईल. पण हे उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचाही सल्ला घ्यावा.
नियमित व्यायाम करा
वजन कमी करण्यासाठी तुम्हाला नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायाम केल्यास शरीरातील कॅलरी कमी करण्यास आणि चरबी जलद गतीनं घटण्यासाठी मदत मिळेल. संशोधनातील माहितीनुसार, नियमित कमीत कमी ५५ मिनिटे व्यायाम करावा. व्यायामामुळे संपूर्ण शरीराची हालचाल होते. शरीर सक्रीय असल्यास अतिरिक्त चरबी जमा होत नाही. यामुळे शरीर देखील हलके होते.
पौष्टिक नाश्ता
पाच दिवसांत वजन कमी करण्यासाठी पौष्टिक खाद्यपदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करण्यावर भर द्यावा. शिवाय नाश्ता पोट भरून करावा. सकाळच्या नाश्त्यामुळे चयापचयाची क्षमता वाढते. यामुळे दिवसभर शरीरातील कॅलरी घटण्यास मदत मिळते. नाश्त्यामध्ये अन्नपदार्थांव्यतिरिक्त फळांचाही समावेश करावा. सोबत शरीराला प्रोटीनचा पुरवठा व्हावा यासाठी अंड्यातील पांढरा भागाचे सेवन करावे.
कॅलरी मोजणे आवश्यक
वजन कमी करण्यासाठी आहारातील कॅलरी कमी करणे सर्वात महत्त्वाची बाब आहे. शरीरातील कॅलरी घटवण्यासाठी आपल्या आहारामध्ये कोणत्या अन्नपदार्थांचा समावेश करावा आणि करू नये, याकडे लक्ष द्यावे. कारण व्यायामासोबत आहार देखील तितकाच महत्त्वपूर्ण आहे. तसंच जेवण आणि नाश्त्याद्वारे किती प्रमाणात कॅलरी शरीरामध्ये जात आहेत, याची नोंद देखील ठेवा.
भरपूर पाणी प्या
शरीर डिटॉक्स करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी पिणे. पाण्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जातात. यामुळे आपल्या शरीराची चयापचयाची क्षमता देखील वाढते. शरीर हायड्रेट राहते आणि ऊर्जाही मिळते. दिवसभरातून कमीत कमी आठ ग्लास पाणी प्यावे. गरम किंवा कोमट पाणी प्यायल्यास शरीराला सर्वाधिक फायदे मिळतील. यामुळे चरबी लवकर घटण्यास मदत मिळते.
आहारामध्ये फळांचा समावेश करा
कार्बोहायड्रेट आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. पण जेव्हा जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेटचे सेवन केले जाते, तेव्हा याचे रुपांतर ऊर्जेमध्ये होण्याऐवजी चरबीमध्ये होते. चरबी शरीरामध्ये जमा होऊ लागल्यास वजन वाढते. यामुळे पाच दिवसात वजन कमी करायचे असेल तर कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ आहारातून वर्ज्य करा. याव्यतिरिक्त जेवणापूर्वी एखादे फळ किंवा फळाचा तुकडा खावा. यामुळे तुमचे पोट भरेल आणि तुम्हाला जास्त भूकही लागणार नाही.
0 Comments