व्यसनाच्या अधीन जाऊन स्वतःचं करिअर गमावून बसले ‘हे’ बॉलिवूड कलाकार; आजही करतायत पश्चाताप
व्यसन ही एक अत्यंत घातक सवय आहे. त्यातही अमली पदार्थांचे व्यसन झाल्यास लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. असे अनेक सिनेस्टार्स आहेत, जे अशा व्यसनांना बळी पडून आपले करिअर गमावून बसले. त्यातील काही कलाकारांनी पुढे येऊन आपल्या या व्यसनांबाबत उघडपणे वक्तव्य केले आहे.
या कलाकारांनी आपल्या व्यसनांबद्दल तर सांगितलेच पण त्याचबरोबर याचा त्यांच्या करिअरवर कसा प्रभाव पडला याबद्दलही त्यांनी खुलसे केले. जाणून घेऊया त्या स्टार्सबद्दल ज्यांनी ड्रग्सच्या दुष्परिणामांबद्दल सांगितले आहे.
यो यो हनी सिंग हा रॅप विश्वातील प्रसिद्ध रॅपर होता. त्याच्या गाण्यांनी तरुणाईला वेड लावले होते. पण त्याच्या अंमली पदार्थांच्या सवयीमुळे काही काळातच त्याचे चांगले करिअर उद्ध्वस्त झाले.
हनी सिंगने आपल्या एका मुलाखतीत सांगितले की तो बायपोलर डिसऑर्डरने त्रस्त होता आणि तो खूप मद्यपान करायचा. अशा परिस्थितीत त्याची प्रकृती आणखीनच बिघडली होती.
दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांनीही, मद्यपानाच्या सवयीमुळे त्यांच्या करिअरची पडझड झाल्याची कबुली दिली. २०११ साली ढासळलेली तब्येत लक्षात घेऊन त्यांनी मद्यपान सोडले.
या यादीत बॉलिवूडचा चॉकलेट हीरो अभिनेता रणबीर सिंगच्या नावाचाही समावेश आहे. अनेक प्रसंगी तो दारू पिताना किंवा सिगारेट ओढताना दिसला. त्याने एका मुलाखतीत कबूल केले आहे की तो जेव्हा अभिनय शाळेत होता तेव्हा तो धूम्रपान करत असे.
अभिनेते राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर बॉलिवूडमध्ये आपली जादू दाखवू शकला नाही. प्रतीक अनेकदा व्यसनमुक्ती केंद्रात जाताना दिसला आहे.
प्रतीकने आपल्या या व्यसनाबद्दल उघडपणे खुलसे केले आहेत. त्याने सांगितले की, त्याने वयाच्या १३ व्या वर्षी ड्रग्स घेण्यास सुरुवात केली. एक काळ असा होता की प्रतीकने नशेत आपले आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते. पण आता प्रतीक ड्रग्जच्या सवयीपासून मुक्त झाला आहे आणि त्याच्या नवीन आयुष्याचा आनंद घेत आहे.
अभिनेता फरदीन खानदेखील ड्रग्जच्या व्यसनाला बळी ठरला आहे. यामुळे त्याच्या चित्रपट कारकिर्दीवरही परिणाम झाला. २००१ मध्ये त्याला जुहू येथून कोकेनसह अटक करण्यात आली होती आणि त्यामुळे त्याला कायदेशीर लढा द्यावा लागला होता.
अभिनेत्री आलिया भट्टची मोठी बहीण पूजा भट्टदेखील तिच्या ड्रग्जच्या सवयीमुळे चर्चेत होती. मात्र या समस्येवर मात करण्यासाठी तिने खूप संघर्ष केला.
स्वत: पूजा भट्टने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, तिने वयाच्या १६ व्या वर्षी दारू आणि वयाच्या २३ व्या वर्षी पहिल्यांदा सिगारेट ओढली होती. पूजा म्हणाली, “दारूच्या सवयीमुळे मी स्वतःला हरवून बसले होते. मृत्यूच्या जवळ जाण्याआधी मी ही सवय सोडली.”
बॉलिवूडचा ‘संजू बाबा’ म्हणजेच संजय दत्त जवळपास १२ वर्षे ड्रग्जच्या प्रभावाखाली होता. अंमली पदार्थ बाळगल्याच्या गुन्ह्यात संजय तुरुंगातही गेला होता. यानंतर त्याचे वडील अभिनेते सुनील दत्त त्याला व्यसनातून मुक्त करण्यासाठी अमेरिकेला घेऊन गेले.
संजय दत्तने एका मुलाखतीत सांगितले की, “जगात असे कोणतेही ड्रग नाही, ज्याचे मी सेवन केले नाही. अमेरिकेत डॉक्टरांनी मला ड्रग्सची यादी दिली तेव्हा त्यात मी कोणते ड्रग्स घेतले हे सांगायचे होते. मी त्या यादीतील प्रत्येक ड्रगवर खूण केली.”
संजयने पुढे सांगितले की, डॉक्टर माझ्या वडिलांना म्हणाले, ‘तुम्ही भारतात कोणते अन्न खाता? त्याने घेतलेल्या ड्रग्सनुसार, आतापर्यंत त्याचा मृत्यू झाला असता.’
संग्रहित फोटो
0 Comments