Delivery करण्यासाठी वापरले जाणारे बॉक्स हे नेहमी तपकिरी रंगाचे का असतात? जाणून घ्या..

 

Delivery करण्यासाठी वापरले जाणारे बॉक्स हे नेहमी तपकिरी रंगाचे का असतात? जाणून घ्या..

ऑनलाइन ऑर्डर केलेल्या वस्तूची डिलीव्हरी तपकिरी (Brown) रंगाच्या बॉक्समधून का केली जाते?

delivery box

मागील काही वर्षांमध्ये ऑनलाइन शॉपिंग करण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल, तर प्रत्यक्ष दुकानामध्ये जाऊन ती वस्तू खरेदी करावी लागत असे. यामध्ये वेळ आणि अधिकचे पैसे खर्च होत असत. आताही बरेचसे लोक ऑफलाइन पद्धतीने वस्तू खरेदी करण्यावर भर देतात. सध्याची तरुण मंडळी मात्र ऑनलाइन शॉपिंग करत असल्याचे पाहायला मिळते. ऑर्डर केलेली वस्तू घरच्या घरी सुखरुपपणे पोहचत असल्याने Amazon, Flipkart यांसारख्या कंपन्याचा खूप फायदा होत आहे. याशिवाय काही लोकांना डिलीव्हरीमार्फत रोजगारदेखील प्राप्त होत आहे. सद्यस्थिती पाहता, पुढील काही वर्षांमध्ये प्रत्येकजण कोणतीही वस्तू विकत घेण्यासाठी ऑनलाइन मार्गाचा अवलंब करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

जर तुम्ही ऑनलाइन शॉपिंग केली असेल, तर खरेदी केलेली वस्तू ही तपकिरी म्हणजेच ब्राऊन बॉक्समध्ये डिलीव्हर होत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. ऑनलाइन ऑर्डर केलेल्या बहुतांश गोष्टी या ब्राऊन बॉक्समधून पाठवल्या जातात. कुरिअर सेवेमध्येही अशाच बॉक्सेसचा वापर केला जातो. डिलीव्हरीदरम्यान वापरले जाणारे हे बॉक्स नेहमी तपकिरी रंगाचेच का असतात असा प्रश्न तुम्हाला एकदा तरी पडला असेल. या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

डिलीव्हरी बॉक्सचा रंग Brown का असतो?

वस्तू एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी प्रामुख्याने तपकिरी रंगाच्या बॉक्सचा वापर केला जातो. हे कार्डबोर्ड बॉक्स कागदापासून तयार केले जातात. काही वेळेस रिसायकल केलेल्या कागदांचा वापर यांच्या निर्मितीमध्ये केला जातो. डिलीव्हरी बॉक्स तयार करण्यासाठी वापरलेले कागद ब्लीच केले जात नाहीत. ब्लीच न केल्याने त्यांचा रंग तपकिरी (Brown) होतो असे म्हटले जाते

Post a Comment

0 Comments