डावा किंवा उजवा डोळा फडफडणे शुभ किंवा अशुभ नाही तर. . .

 

डावा किंवा उजवा डोळा फडफडणे शुभ किंवा अशुभ नाही तर ‘हे’ आहे त्यामागचे वैज्ञानिक कारण…

आपल्या देशात डोळे फडफडण्याचा संबंध शुभ आणि अशुभ कारणांशी जोडला जातो. यात स्त्री आणि पुरुष यांचा उजवा किंवा डावा डोळा फडफडणे यामागेही वेगवेगळे अर्थ लावले जातात. पण या गोष्टींमागे अनेक वैज्ञानिक कारणं देखील आहेत, ती कारणं कोणती जाणून घेऊ…

why is eye flutter frequently

डोळा हा माणसाच्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. डोळे फडफडणे हे खूप सामान्य लक्षण आहे. मात्र आपल्या समाजात डोळे फडफडण्याबाबत अनेक गैरसमजुती आहेत. यामुळे डोळा फडफडणे यामागे शुभ, अशुभ अशी कारणे जोडली जातात. परंतु डोळा फडफडण्यामागे अनेक वैज्ञानिक कारणेदेखील आहेत. ही वैज्ञानिक कारणे नेमकी काय आहेत जाणून घेऊ…

डोळे कोरडे होणे

कोरडेपणामुळेही अनेकदा डोळे फडफडतात. याशिवाय ॲलर्जीमुळे किंवा डोळ्यांत जास्त पाणी येण्यामुळेही डोळे फडफडण्याची समस्या उद्भवू शकते.

पुरेशी झोप न होणे

तुमची पुरेशी झोप झाली नसेल तरीही ही समस्या दिसून येते. बराच वेळ जागे राहून पुस्तक वाचत राहिलात किंवा एखादा चित्रपट पाहत राहिल्यास झोप पूर्ण होत नाही. यामुळेही अनेकदा डोळे फडफडतात. यात कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाइलवर जास्त वेळ घालवल्यामुळेही असे होऊ शकते.

स्नायूंसंबंधित समस्या

डोळ्यांच्या स्नायूंशी संबंधित काही समस्यांमुळेही वारंवार डोळे फडफडतात. पण जर तुमचे डोळे जास्त प्रमाणात फडफडत असतील तर डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. यात तुमच्या चष्म्याच्या नंबरमध्ये काही बदल झाला आहे किंवा होणार असेल हे समजू शकेल.

तणाव

तणावाच्या परिस्थितीतही डोळे फडफडण्याची समस्या जाणवते. जर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल खूप चिंतेत असाल आणि सतत त्याबद्दल विचार करीत असाल तर त्यामुळे तणाव वाढतो आणि त्यामुळे तुमची डोळे फडफडण्याची समस्या वाढते. तणावामुळे अनेकदा झोपही पूर्ण होत नाही.

शरीरात मॅग्नेशियमची कमतरता

शरीरातील मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळेही अनेकदा डोळे फडफडू शकतात. याशिवाय चहा-कॉफी, अल्कोहोल किंवा ड्रग्जचे जास्त सेवन केल्यामुळेही ही समस्या दिसून येते.

Post a Comment

0 Comments