Quick Sleep: रात्री करा हे छोटंसं काम, डोळे बंद करताच लागेल गाढ - शांत झोप, कोणालाच माहीत नाही हा सिक्रेट उपाय

             झोपेचे अनेक फायदे आहेत. आपले मन आणि स्नायू यांना आराम मिळावा व ते रिलॅक्स व्हावेत यासाठी झोप घेणे आवश्यक आहे. झोपेच्या कमतरतेमुळे लठ्ठपणा, डायबिटीज, हृदयविकार, खराब मूड, ताणतणाव इत्यादी समस्या सतावू शकतात. म्हणूनच दररोज पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. काही लोकांना रात्री काही केल्या झोपच येत नाही. ते बराच काळ आणि कधी कधी पूर्ण रात्रभर एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत असतात. झोप लागली तरी खूप उशिराने लागते.



जर तुम्हाला देखील अशी समस्या असेल तर एक असे काम आहे जे केले तर डोळे बंद करताच झोप येऊ शकते. तेही ही झोप इतकी शांत व गाढ असेल की तुम्ही थेट दुस-या दिवशी सकाळीत 8 तासांची झोप पूर्ण झाल्यावर उठाल. दुसऱ्या दिवशी तुम्हाला फ्रेश आणि फोकस पाहून बाकीचे लोकं सुद्धा तुम्हाला याचे रहस्य विचारतील. चला तर आजच्या लेखातून जाणून घेऊया की अशी काय गोष्ट आहे जी केल्याने तुम्ही सुखाची झोप मिळवू शकता. (फोटो सौजन्य :- iStock)

रात्री करा हे छोटेसे काम

रात्री करा हे छोटेसे काम

झोपेमुळे तुमच्या शरीराचे तापमान कमी होते. यामुळे रात्रीच्या वेळी खोली थोडीशी थंड करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे शरीराचे तापमान कमी होईल आणि मेंदूला झोपेचा सिग्नल मिळेल.


कोमट पाण्याने अंघोळ करा

कोमट पाण्याने अंघोळ करा

झोपण्यापूर्वी तुम्ही कोमट पाण्याने आंघोळ करू शकता. असे केल्याने तुमच्या शरीराचे तापमान काही काळ वाढेल. पण तो हळूहळू कमी व्हायला लागल्यावर मेंदूला झोपेचा सिग्नल मिळेल. ज्यामुळे लगेच झोपायला मदत होईल.


योग निद्राने येईल काही मिनिटांत झोप

योग निद्राने येईल काही मिनिटांत झोप

योगच्या मदतीने तुम्हाला काही मिनिटांतच झोप येईल. ज्यासाठी तुम्ही बेडवरच योग निद्रा करू शकता. या प्रकारात, बेडवर झोपताना काही वेळ प्रत्येक अवयवावर एक एक करून तुम्हाला लक्ष केंद्रित करायचे आहे.


या गोष्टी लक्षात ठेवा

या गोष्टी लक्षात ठेवा

लवकर झोपण्यासाठी मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर गॅजेट्स बेडपासून दूर ठेवावेत. ते तुमचे लक्ष विचलित करतात आणि तुम्हाला झोपे पासून दूर करतात. तसेच, बेडवर झोपताच तुमच्या खोलीतील दिवे बंद करा.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Post a Comment

0 Comments