IPL2023: नेहल वढेराचा एकच शॉट अन कारला पडला खड्डा, TATAला पाच लाखांचा भुर्दंड
MI vs RCB: टाटा बर्याच काळापासून आयपीएलचे अधिकृत प्रायोजक आहेत. मुंबई विरुद्ध बंगळुरू सामन्यादरम्यान नेहल वढेराने शानदार षटकार मारला पण त्याच्या या षटकारामुळे टाटांना मोठे नुकसान झाले आहे.
IPL2023, MI vs RCB: मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध २०० धावांचे लक्ष्य सहज पार केले. मुंबईने केवळ १६.३ षटकात दमदार विजय मिळवला. आयपीएलच्या १६व्या मोसमात, ९ मेच्या रात्री झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने धडाकेबाज अर्धशतक झळकावले. त्याला दुसऱ्या टोकाकडून युवा फलंदाज नेहल वढेराने चांगली साथ दिली. सूर्याने ३५ चेंडूत ८३ धावा केल्या, तर वढेराने ३४ चेंडूत ५२ धावांचे नाबाद अर्धशतक झळकावले. यादरम्यान वढेराच्या बॅटमधून निघालेल्या षटकारांनी वानखेडे स्टेडियममध्ये खळबळ उडवून दिली. मात्र, त्यामुळे टाटांच्या गाडीचे नुकसान झाले आणि फायदाही झाला.
वढेराचा एकच षटकार अन टाटांच्या कारला पडला डेंट
वास्तविक ११व्या षटकात वानिंदूने हसरंगाला गोलंदाजी करण्यासाठी आणले. २२ वर्षीय वढेराने पहिल्याच चेंडूवर एकेरी धाव घेत सूर्याला स्ट्राइक दिली. सूर्यकुमार यादवने षटकार ठोकत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली आणि त्यानंतर नेहलकडे स्ट्राईक आली. तरुण तडफदार या फलंदाजाने षटकार मारत स्लॉग स्वीप मारला जो सीमारेषेबाहेर उभ्या असलेल्या कारवर आदळला. शॉट एवढा जबरदस्त होता की कारला खूप मोठा डेंट पडला. त्याचा हा षटकार टाटांना खूप महागात पडला.
पाच लाख रुपये द्यावे लागणार
नेहल वढेराच्या शॉटमध्ये एवढी ताकद होती की टाटाच्या गाडीला डेंट पडला. अशा परिस्थितीत आता टाटा टियागो ईव्ही या गाडीला लागलेल्या चेंडूच्या बदल्यात गरीबांना पाच लाख रुपये दान करणार आहे. नियमानुसार, चेंडू सरळ जाऊन गाडीवर आदळला, तर कर्नाटकातील कॉफीच्या बागांची जैवविविधता वाढवण्यासाठी पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल. टाटा हे आयपीएलचे प्रदीर्घ काळ अधिकृत प्रायोजक आहेत आणि स्पर्धेच्या सुरुवातीलाच या गटाकडून घोषणा करण्यात आली होती की, प्रत्येक वेळी एक चेंडू गाडीवर आदळल्यास, कर्नाटकातील कॉफीच्या मळ्यांना पाच लाखांची रक्कम दिली जाईल.
मुंबई इंडियन्स पहिल्या सर्वोत्तम तीनमध्ये
आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली. कोहली लवकर बाद झाल्यानंतर फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या भागीदारीने संघाला ब-याच धावा केल्या, पण लवकर विकेट पडल्यामुळे आरसीबीची धावसंख्या २००च्या पुढेही जाऊ शकली नाही. प्रत्युत्तरादाखल, मुंबई पलटणने नेत्रदीपक कामगिरी करत सामना जिंकला आणि गुणतालिकेत अव्वल तीन संघांमध्ये आपले स्थान पक्के केले.
0 Comments