सीबीएसईच्या इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर, यंदा टॉपर्स लिस्ट नाही, असा पाहा ऑनलाईन निकाल
CBSE Result 2023: सीबीएसई बोर्डाने इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर केला आहे. यंदा बारावीच्या परीक्षेत ८७.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहू शकतात.
यंदा सीबीएसईच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत त्रिवेंद्रम झोनने ९९.९१ टक्क्यांसह सर्वोत्तम कामगिरी केली आहे. यानंतर बंगळुरू ९८.६४ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यंदा मुलींचा निकाल मुलांपेक्षा चांगला लागला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ६ टक्के चांगला आहे, यंदा मुलांचा निकाल ८४.६८ टक्के तर मुलींचा निकाल ९०.६८ टक्के लागला आहे. या वर्षी एकूण १६,६०,५११ विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. यांपैकी १४,५०,१७४ विद्यार्थी उर्तीण झाले आहेत.
यंदा कोणतीही टॉपर लिस्ट नाही
यंदा सीबीएसई बोर्डाने विद्यार्थ्यांमधील स्पर्धा टाळण्यासाठी इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेच्या निकालातील टॉपर लिस्ट प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त बोर्डाने प्रथम, द्वितीय किंवा तृतीय क्रमांकांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर न करण्याचाही निर्णय घेतला आहे. त्याऐवजी सीबीएसई वैयक्तिक विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळविलेल्या अव्वल ०.१ टक्के विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्रे देणार आहे. सीबीएसईचा या मागचा उद्देश विद्यार्थ्यांनी रँक आणि डिव्हिजनसाठी स्पर्धा करण्याऐवजी स्वतः शिकण्यावर आणि शैक्षणिक वाढीवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करणे आहे.
२१ मार्च ते ५ एप्रिल २०२३ या कालावधीत बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. सीबीएसईने इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल CBSE च्या अधिकृत वेबसाईटवर तसेच UMANG आणि Digilocker अॅपवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
CBSE 12th Result 2023 : डिजिलॉकरवर इयत्ता १२ वीचा निकाल कसा तपासायचा?
२) आता तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि OTP वापरून लॉग इन करा.
३) Education सेक्शनवर क्लिक करा आणि ‘Central Board of Secondary Education’ निवडा.
४ ) तुमचा CBSE रोल नंबर, शाळेचा कोड आणि जन्मतारीख टाका.
५) Get Document बटणावर क्लिक करा.
६)तुमचा CBSE निकाल स्क्रीनवर डिस्प्ले होईल. आता भविष्यातील विविझ कारणांसाठी लागणारा निकाल डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.
0 Comments