साप्ताहिक राशिभविष्य

साप्ताहिक राशिभविष्य

मेष 

मेष : नातेवाईकांचे सहकार्य

दिनांक ७, ८  या दोन दिवसांत इतरांनी दिलेला सल्ला तुम्हाला आवडणार नाही आणि नेमके तेच घडणार आहे. एखादी व्यक्ती तुम्हाला सल्ला द्यायला येणार आणि तुम्ही त्या व्यक्तीला प्रत्युत्तर करायला जाणार. त्यामुळे चाललेली सुरळीत घडी बिघडू शकते. ही गोष्ट शांततेने हाताळा. संवाद साधताना कठोर वाणी टाळा. महत्त्वाच्या काही गोष्टी करावयाच्या असल्यास हे दोन दिवस सोडून करा. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. व्यवसायामध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक कराल. या गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील.

आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात स्पष्टवक्तेपणा टाळा. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. घरगुती वातावरण चांगले राहील. आरोग्य ठीक राहील.

शुभ दिनांक : ९, १०

महिलांसाठी : सार्वजनिक ठिकाणी सहभाग राहील.

taurus
वृषभ

वृषभ : अनपेक्षित लाभ होईल

दिनांक ९, १०  हे दोन दिवस मिळतेजुळते घ्यावे लागेल, तरच हे दिवस चांगले जातील. अन्यथा कारण नसताना किरकोळ गोष्टीवरून वाद होऊ शकतो. हा वाद होऊ नये असे वाटत असेल तर स्वत:ची तत्त्वे सध्या तात्पुरती बाजूला ठेवा. त्यामुळे अडचण येणार नाही. विरोधी भूमिका टाळा. कामासाठी धावपळ झाली तर चिडचिड करू नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल.

व्यावसायिकदृष्टय़ा सक्षम बनाल. व्यवसायातील आवक-जावक वाढेल. नोकरदार वर्गाला नवीन काम मिळेल. आर्थिकदृष्टय़ा आणि अपेक्षित लाभ होईल. राजकीय क्षेत्रात ज्या कामासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात ते काम विलंबाने होईल. कौटुंबिक आनंद मिळेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. धार्मिक गोष्टीत सहभाग राहील. आहारावर नियंत्रण ठेवा.

शुभ दिनांक : ११, १२

महिलांसाठी : इतरांवर वर्चस्व गाजवाल.

gemini
मिथुन

मिथुन : प्रकृती जपा

षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. असे भ्रमण ज्या ज्या वेळी येणार आहे. त्या वेळी मात्र सतर्कता बाळगावी लागणार. ठरवून कुठलीही गोष्ट साध्य होत नाही याचा अनुभव येईल. कोणतेच काम वेळेत होणार नाही. त्यामुळे अंगातील आळस वाढणार आहे. या कालावधीत ध्यानीमनी नसताना वादग्रस्त विषय समोर येऊ शकतात. अशा वेळी आपली भूमिका ही वाद घालण्यासाठी ठाम असते. सध्या ग्रहमान चांगले नाहीत हे विसरू नका. इतरांपेक्षा तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो. त्यापेक्षा शांत राहा. सर्व दिवसांचा कालावधी जपून हाताळा. व्यवसायात नवी उलाढाल करूच नका. नोकरदार वर्गाने कामात व्यस्त राहा.

वायफळ खर्च टाळा. समाजमाध्यमांपासून लांब राहा. घरामध्ये सध्या जोडीदाराव्यतिरिक्त कोणी समजून घेणार नाही. प्रकृती जपा.

शुभ दिनांक : ९, १०

महिलांसाठी : नवीन घडामोड टाळा.

Cancer
कर्क

कर्क : गोड बोलून काम करा

दिनांक ९ आणि १०, १३  असे हे दिवस चांगले की वाईट याचा विचार न करता निर्णय घ्याल. त्यामुळे अडचणी वाढू शकतात. प्रत्येक गोष्ट विचाराने करावी लागेल. आपले काम साध्य करायचे आहे. तिथे गोड बोलून करावे लागेल. रागाच्या भरात तोंडातून गेलेला शब्द पुन्हा परत येणार नाही; तेव्हा बोलताना शब्द जपून वापरा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल. व्यावसायिकदृष्टय़ा धावपळ होईल. ही धावपळ होऊ नये असे वाटत असेल तर व्यावसायिक नियोजन व्यवस्थित करा. नोकरदार वर्गाच्या कामातील गती वाढेल.

अनावश्यक खर्च टाळा. सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लावून कोणतीही गोष्ट करू नका. मुलांसोबत करमणूक घडेल.

जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. द्विधावस्था टाळा. प्रकृतीची काळजी घ्या.

शुभ दिनांक : ७, ८

महिलांसाठी : भावनिक गोष्टीत अडकू नका.

leo
सिंह

सिंह : खर्च सांभाळा

दिनांक ११, १२  रोजी आपल्याला झेपेल अशाच गोष्टींना हात घाला. न झेपणाऱ्या गोष्टींच्या मागे लागू नका. कोणावर अवलंबून कोणतीच गोष्ट होणार नाही. जे काही करायचे आहे ते स्वत:लाच करायचे आहे हे विसरू नका. त्यासाठी थोडा वेळ द्या. वारंवार जुन्या गोष्टीच्या तळामुळाशी जाऊ नका. नको त्या भानगडी वाढवू नका. सकारात्मक विचार करा. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल.

खरेदी-विक्री व्यवसायात फायदा होईल. व्यापारी वर्गाला दिलासा मिळेल. नोकरदार वर्गासाठी वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल. आर्थिक बाबतीत व्यवहार चोख ठेवा व खर्च सांभाळा. समाजसेवा करताना थोरामोठय़ांचे सहकार्य मिळेल.

मैत्रीचे नाते दृढ होईल. संतती सुख लाभेल. घरातील वातावरण हसते-खेळते राहील. प्रकृती- बाबतीत हलगर्जीपणा टाळा.

शुभ दिनांक : ९, १०

महिलांसाठी : अति धाडस टाळा.

gemini
कन्या

कन्या : ज्येष्ठांची कृपा राहील

दिनांक १३ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. या चांगल्या दिवसांमध्ये बरेच काही करायचे आहे. तेव्हा वेळ वाया घालवू नका. तुमच्या परस्पर नकळत कोणतेही झालेले बदल स्वीकारायला तुम्हाला अवघड जाते; पण सध्या हे बदल पटकन स्वीकारून कामाला लागणे अशीच परिस्थिती निर्माण होईल. व्यवसायातील कसरत कमी होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही. नोकरदार वर्गाला ज्येष्ठांची कृपा राहील.

आर्थिकदृष्टय़ा परिस्थिती चांगली असल्यामुळे मनासारखी खरेदी कराल. राजकीय क्षेत्रात उत्साह वाढेल.

मुलांचे लाड व शिस्तबद्धपणा या दोन्ही गोष्टी एकाच वेळी तुम्हाला सहज जमतील. कुटुंब आनंदी असेल. आरोग्य उत्तम राहील.

शुभ दिनांक : ११, १२

महिलांसाठी : दिलेला शब्द पाळाल.

libra
तूळ

तूळ : प्रतिभा उंचावेल

शुभ ग्रहांची साथ चांगली राहील. मागील काही दिवसांपेक्षा सध्याचे ग्रहमान चांगले आहे. या चांगल्या दिवसांत तुमची प्रतिभा उंचावणार आहे, असे म्हणायला हरकत नाही. यशस्वी वाटचालीसाठी जे प्रयत्न करत होता त्या प्रयत्नांना आत्तापर्यंत यश मिळत नव्हते. हे यश आता मिळणार आहे. नवीन घडामोडींची सुरुवात होईल. स्वकर्तृत्व सिद्ध होईल. अडथळय़ांचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे पुढील कामाचा आराखडा तयार करता येईल. इतरांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिकदृष्टय़ा केलेले व्यवहार मार्गी लागतील.

भागीदारी व्यवसायात चाललेल्या घडामोडींत चांगले बदल घडतील. नोकरदार वर्गाला काम करताना उत्साह वाटेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. भावंडांशी मनमोकळेपणाने बोलाल. नातेवाईकांच्या कार्यक्रमांत सहभागी व्हाल. प्रकृती साथ देईल.

शुभ दिनांक : ८, ९

महिलांसाठी : योग्य मार्ग मिळेल.

soc
वृश्‍चिक

वृश्चिक : कार्य सिद्धीस जाईल

सप्ताहातील सर्व दिवसांचा कालावधी चांगला राहील. प्रत्येक गोष्टीत स्वत:चेच वर्चस्व गाजवाल. मी म्हणेल तीच पूर्व दिशा. हे ग्रहमान चांगले असल्यामुळे समोरच्याला ऐकून घेतल्याशिवाय पर्याय नाही असेच घडेल. एखादी गोष्ट जमत नाही म्हणून तुम्ही प्रयत्न सोडत नाही. त्याचा पाठपुरावा करून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करता. सध्या पाठपुरावा करण्याची गरज भासणार नाही. सहज, सरळमार्गे कामे होत राहतील. हाती घेतलेले कार्य सिद्धीस जाईल. व्यवसायात चालून आलेली संधी सोडू नका.

नोकरदार वर्गाला वरिष्ठांचा प्रतिसाद मिळेल. आर्थिक अडचणी दूर होतील. समाजसेवा करावीशी वाटेल. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. जोडीदाराच्या मनोकामना पूर्ण होतील. धार्मिक गोष्टींत उत्साह वाढेल. मानसिक समाधान लाभेल. प्रकृती उत्तम राहील.

शुभ दिनांक : ७, ८

महिलांसाठी : स्वत:च्या कामात गुंतून राहाल.

Sagi
धनु

धनू : भटकंती टाळा

दिनांक  ७ आणि ८ असे हे दोन दिवस काही काम नसतानासुद्धा भटकंती करावीशी वाटेल; पण ही भटकंती टाळा, अन्यथा शारीरिक परिणाम होऊ शकतो. इतरांना मदत करताना परिस्थितीचे भान ठेवा. स्वत:हून स्वत:चे नुकसान करून घेऊ नका. प्रत्येक गोष्ट घाईगडबडीने करायची सवय सोडून द्या. स्पष्टवक्तेपणा टाळा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला राहील. व्यवसायात इतर मार्गातून आलेले प्रस्ताव स्वीकारताना विचार करा. आपली आवक-जावक पाहून मगच गुंतवणूक करा. नोकरदार वर्गाने आपले काम इतरांच्या जबाबदारीवर न टाकता स्वत:च केलेले चांगले राहील. खर्च आटोक्यात ठेवा. समाजसेवा करताना आपल्याला झेपेल अशाच बेताने करा. कौटुंबिक वादविवाद टाळा. मानसिकदृष्टय़ा द्विधा अवस्था होऊ देऊ नका. सध्या आध्यात्मिक गोष्टीत मन लागणार नाही. प्रकृती ठीक राहील.

शुभ दिनांक : ९, १०

महिलांसाठी : आपले मत इतरांवर लादू नका.

capri
मकर

मकर : मन स्थिर ठेवा

दिनांक ९, १० या दोन दिवसांत मन स्थिर ठेवा. आपली इच्छा नसताना काही गोष्टी समोर येणार आहेत. अशा वेळी धीर धरून वागावे लागते हे विसरू नका. परिस्थितीनुसार निर्णय घ्यायला शिका. इतरांना दोष देत बसू नका. स्वत:चे काम स्वत:च करा. आळस बाजूला सारून कामाला लागा. ज्या ठिकाणी प्रतिक्रिया द्यायच्या असतात अशा ठिकाणी गप्प राहता व ज्या ठिकाणी द्यायच्या नाहीत अशा ठिकाणी मात्र पटकन प्रतिक्रिया देता, हा स्वभावगुणधर्म बदला. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. व्यवसायात चढउतार असला तरी फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाला अनुभवातून शिकावयास मिळालेल्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. खर्च जपून करा. मैत्रीचे नाते अतूट होईल. फटकळ बोलण्याने कुटुंबातील आनंद गमावून बसू नका. जोडीदाराचा राग राग करू नका. शारीरिकदृष्टय़ा योगसाधनेला महत्त्व द्या.

शुभ दिनांक : ७, ८

महिलांसाठी : प्रयत्न सोडू नका.

Aqua
कुंभ

कुंभ : रोखठोक व्यवहार करा

दिनांक ११, १२ अशा या दोन दिवसांचा कालावधी ‘धरले तर चावते सोडले तर पळते ’ अशी परिस्थिती निर्माण होईल. काय करावे, कोणता निर्णय घ्यावा हे सुचणार नाही. सध्या घाई करून कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही. प्रत्येक गोष्टीत संयम महत्त्वाचा राहील. कोणतेही काम करण्यापूर्वी आधी त्या कामाचा आराखडा तयार करा. मगच कामाला सुरुवात करा. त्यामुळे कोणते काम अडणार नाही. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यावसायिकदृष्टय़ा भरभराट राहील. व्यवसायात घेतलेले निर्णय यशस्वी होतील. नोकरदार वर्गाच्या मनोकामना पूर्ण होतील. आर्थिकदृष्टय़ा व्यवहार रोखठोक करा. राजकीय क्षेत्रात मानपानाची हौस पुरवून घ्याल. मित्रपरिवाराबरोबर मौजमजा कराल. घरगुती वातावरण चांगले असेल. प्रकृती ठीक राहील.

शुभ दिनांक : ९, १०

महिलांसाठी : वेळेचे बंधन पाळा.

pices
मीन

मीन : शुभेच्छा मिळतील

१३ तारखेचा एकच दिवस फारसा अनुकूल नाही, पण बाकीचे दिवस खूप चांगले असतील. भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. हे भ्रमण गुळाच्या गोडीप्रमाणे  दिवस चाखायला मिळतील असेच म्हणावे लागेल. चांगले दिवस असले की, जी महत्त्वाची कामे करायची असतात ती विसरून जाता आणि नको त्या कामात गुंतून राहता. या चांगल्या दिवसाला सुवर्णसंधी समजा व कुठेही कमी पडू नका. तुम्ही केलेल्या कामाबद्दल तुम्हाला शुभेच्छा मिळतील. व्यावसायिकदृष्टय़ा एखादी गोष्ट ठरवून करायची म्हटली तर होत नव्हती, पण सध्या ती होणारी आहे.

नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत दिलासा मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी पडतील. मुलांचा स्वभाव हट्टी बनेल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

शुभ दिनांक : ७, ११



 

Post a Comment

0 Comments