उद्यापासून परशुराम घाट २४ तास खुला, पण पावसाळ्यात…

                रत्नागिरी: उद्या ११ मे पासून मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट २४ तास वाहतुकीसाठी खुला होणार आहे. काल ९ मे रोजी परशुराम घाटात दरड कोसळली होती. त्यानंतर आता हा रस्ता उद्यापासून वाहतूकीसाठी खुला होणार आहे. दरम्यान, २५  एप्रिल २०२३ पासून परशुराम घाटातील वाहतूक दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.

पावसाळ्यात घाट त्रासदायक

            परशुराम घाटाचं काम गेली दोन वर्ष युद्ध पातळीवर सुरू आहे. पावसाळ्याआधी घाटातील रुंदीकरण पूर्ण करायचं होतं. मात्र, ठेकेदाराकडून फक्त ४० टक्केच काम पूर्ण झाले आहे. रुंदीकरणाच्या ठेकेदार कंपनीनं पावसाळ्यापूर्वी या घाटातील रुंदीकरण आणि उर्वरित कामं पूर्ण व्हावी यासाठी या घाटातील वाहतूक काही दिवस बंद करण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे केली होती. त्यानंतर ही मागणी मान्य करून येत्या २५ एप्रिल ते १० मेपर्यंत या घाटातील वाहतूक ठराविक वेळेत दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पूर्णतः बंद करण्यात आला होता. मात्र, ४० टक्केच काम झाल्याने प्रवाशांचे पावसाळ्यात हाल होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments