बारसू रिफायनरीबाबत अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका म्हणाले.... .

 

बारसू रिफायनरीबाबत अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले, “विकासाबाबत राष्ट्रवादी सकारात्मक, पण…”

भावी पिढी बराबद होणार असतील, तर जरूर विरोध केला पाहिजे. यात दुमत नाहीच यातून फायदा होणार असेल, आर्थिक सुबत्ता येणार असेल, तर या अँगलने विचार केला पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar clarified his stance on Barsu Refinery said NCP is positive about development but

                बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राज्यात राजकीय घमासान सुरू आहे. रिफायनरीसाठी बारसूची जागा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच सुचवली होती, असा दावा केला जात आहे. त्यातच, ठाकरे गटाचे खासदार या प्रकल्पाला विरोध दर्शवत असले तरीही या भागाचं प्रतिनिधित्व करणारे आमदार मात्र प्रकल्पाच्या समर्थनार्थ असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते अजित पवारांची भूमिका काय याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता अजित पवारांनीही या प्रकल्पाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. आज ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

                बारसू येथील रिफायनरीला विरोध करण्यासाठी नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्या आंदोलकावर लाठीचार्ज झाल्याची घटना घडली आहे. त्या प्रश्नावर अजित पवार यांनी भूमिका मांडली. यावेळी अजित पवार म्हणाले की, “बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तसेच माझे देखील उदय सामंत यांच्यासोबत बोलणे झाले आहे. त्या प्रकल्पामुळे तेथील गावांचा किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, याबाबत उदय सामंत यांनी सांगितले आहे. पण तेथील नागरिक जर विरोध करत असतील तर त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. त्यामुळे शंकांचे निरसन होईपर्यंत सर्वेक्षण थांबवले पाहिजे”, अशी माझी भूमिका आहे. तसेच “गरज पडल्यास मी देखील आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यास जाईल”, अशी भूमिका देखील त्यांनी मांडली.

तसेच ते पुढे म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेहमीच विकासाबाबत सकारात्मक भूमिका राहिली आहे. आपल्या राज्यातून अनेक प्रकल्प बाहेर गेलेले आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नसेल तर, जनजीवन, मासेमारी, पर्यटन यावर परिणाम होणार नसेल तर विरोधकांना समजून सांगावं, यात संवेदनशीलता सरकारने दाखवावी, समज गैरसमज दूर करावेत. चर्चेतून मार्ग निघू शकतो.”

“ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली खासदार विरोध करतात, पण मी राजन साळवींचं स्टेटमेंट मी पाहिलं आहे. ते या भागाचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचं मात्र म्हणणं आहे की आमचा पाठिंबा आहे. चार-पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारे आमदार म्हणतात की आमचा पाठिंबा आहे, त्यामुळे कायमचं नुकसान होणार असेल, भावी पिढी बराबद होणार असतील, तर जरूर विरोध केला पाहिजे. यात दुमत नाहीच यातून फायदा होणार असेल, आर्थिक सुबत्ता येणार असेल, तर या अँगलने विचार केला पाहिजे”, असंही अजित पवार म्हणाले.

Post a Comment

0 Comments