म्हाडा कोकण मंडळ सोडत २०२३: इच्छुकांचे ४९ हजार १७४ अर्ज पात्र; आता सोडतीची प्रतीक्षा
दैनिक कोकण प्रतिनिधी
मुंबई: म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४,६५४ (१४ भूखंडांसह) घरांच्या सोडतीच्या स्वीकृत अर्जांची अंतिम यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली असून एकूण ४९ हजार १७४ अर्ज पात्र ठरले आहेत. आता बुधवार, १० मे रोजी ठाण्यात सोडत काढण्यात येणार आहे.
कोकण मंडळाच्या सोडतीसाठी ८ मार्चपासून नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली होती. ही प्रक्रिया नुकतीच संपुष्टात आली. स्वीकृत अर्जांची अंतिम यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीनुसार ४९ हजार १७४ अर्ज पात्र ठरले आहेत.
‘पीएमएवाय’साठी ३५१ अर्ज, २० टक्के योजनेसाठी ४६ हजार १६ अर्ज, म्हाडा गृहनिर्माणमधील घरांसाठी दोन हजार ४३८ अर्ज आणि ‘प्रथम प्राधान्य’ योजनेतील घरांसाठी ३६९ अर्ज पात्र ठरले आहेत. आता ४,६५४ (१४ भूखंडांसह) घरांसाठी बुधवार, १० मे रोजी सोडत काढण्यात येणार आहे.
0 Comments