बारसू शेतकऱ्यांच्या आंदोलन ठिकाणी यांनी येण्याचा प्रयत्न केला तर जनता तुम्हाला तोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा किंवा दम समजा या भाषेत त्यांनी त्यांना इशारा दिला आहे. संजय राऊत रंग बदलत नाहीत तर राणे कुटुंबीय रंग बदलतात त्यांनी मागील वर्षात अनेक रंग जनतेला दाखवले आहेत.
Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या आरोप प्रत्यारोपामुळे ढवळून निघाले आहे. त्यातच खासदार संजय राऊत यांच्यावर भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांकडून वारंवार टीका केली जात आहे. त्यांच्यावर राणे कुटुंबीयांकडून टीका केली जात असल्यानेच ठाकरे गटाचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी त्यांची बाजू घेत म्हणाले आहेत की, खासदार संजय राऊत कधीच नीच आणि घाणेरडे राजकारण करत नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
शरद कोळी यांनी नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीका करताना त्यांनी सडकून टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, खरंतर राणे कुटुंबीयांचं आगलावे आडनाव पाहिजे होतं, यांनीच अख्या महाराष्ट्रातील राजकारणात आग लावण्याचे काम केलं आहे असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
महाराष्ट्रातील राजकारण गटारीसारखं गढूळ राणे यांच्यामुळे झालं आहे असंही त्यांनी म्हटले आहे. यावेळी शरद कोळी यांनी त्यांना स्वार्थी राजकारणी असल्याचे सांगत राणे कुटुंबीय म्हणजे सत्ता तिकडे चांगभलं असे करत असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
शेतकरी ज्या पद्धतीने शेतात सालगडी ठेवतात त्या पद्धतीने भाजपने नितेश राणेला राजकारण खराब करण्यासाठी सालगडी म्हणून ठेवले असल्याचा घणाघातही त्यांच्यावर केला आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जर कोणी बोलण्याचा अथवा मोर्चा काढण्याचे धाडस करू नये. त्यामुळे नितेश राणेंना बजावून सांगतो बेडकाने हत्तीचा मुका घ्यायला जायचं नाही हत्ती पायदळी तुडवल्या शिवाय राहणार नाही असा उपरोधिक टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.
राणे कुटुंबीयांवर आता कोकणातील जनतेचा तीव्र राग आहे, तुम्ही कोकणातील असून बारसूच्या शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही त्यामुळे राणे यांनी पुन्हा बारसूमध्ये जाण्याचा विचार करु नये.
कारण बारसू शेतकऱ्यांच्या आंदोलन ठिकाणी यांनी येण्याचा प्रयत्न केला तर जनता तुम्हाला तोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा किंवा दम समजा या भाषेत त्यांनी त्यांना इशारा दिला आहे.
शरद कोळी यांनी नितेश राणे आणि नारायण राणे यांचा राजकीय बाप कोण असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत .उद्धव ठाकरे साहेबांना अडवण्याचा प्रयत्न केला बारसुतील जनता आणि शिवसैनिक कुत्र्यासारखा फोडून काढतील असा इशारा शरद कोळी यांनी दिला आहे.

0 Comments