‘खुपते तिथे गुप्ते’च्या पहिल्या भागात हजेरी लावणार राज ठाकरे, प्रोमोवर केमेंट करत तेजस्विनी पंडित म्हणाली…


tejaswini

            अत्यंत गाजलेल्या कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणजे ‘खुपते तिथे गुप्ते.’ गायक-संगीतकार अवधूत गुप्ते या कार्यक्रमात मान्यवर मंडळींना बोलतं करतो. हा कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय ठरला होता. या कार्यक्रमाची पहिली दोन्हीही पर्वं चांगलीच गाजली होती. पण त्यानंतर काही वर्षं हा कार्यक्रम बंद करण्यात आला. आता हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

            काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाची घोषणा करण्यात आली. तेव्हापासूनच या कार्यक्रमाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता निर्माण झाली होती. हा कार्यक्रम कधी सुरू होणार आणि त्याच्या पहिल्या भागात कोण मान्यवर व्यक्ती हजेरी लावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. तर आता ते गुपित उघड झालं आहे.

या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचा प्रोमो नुकताच आऊट झाला. त्यावरून या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात मनसेप्रमुख राज ठाकरे हजेरी लावणार असल्याचं समोर आलं. या प्रोमोमध्ये त्यांची पाठमोरी झलक पाहायला मिळत आहे. तर आता या प्रोमोवर नेटकरी कमेंट करत त्यांची उत्सुकता व्यक्त करत आहेत. अशातच अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनेदेखील या पोस्टवर कमेंट केली. तिने लिहिलं, “साहेब.” हे लिहीत तिने हार्ट इमोजीही दिले. आता तिच्या या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

‘खुपते तिथे गुप्ते’ हा बहुप्रतीक्षित कार्यक्रम ४ जूनपासून दर रविवारी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या पहिल्या भागाचा प्रोमो पाहून या कार्यक्रमाबद्दलची प्रेक्षकांच्या मनातली उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

Post a Comment

0 Comments