देवगड, ता. १७ ः नव्याने स्थापन झालेल्या देवगड तालुका शूटिंग व्हॉलीबॉल असोसिएशनच्यावतीने जामसंडे येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय प्रीमियर लीग शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत शिरगाव येथील ओम् गणेश संघ विजेता ठरला. जामसंडे येथील श्री. मो. गोगटे माध्यमिक विद्यामंदिरच्या मैदानावर ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार अॅड. अजित गोगटे यांच्या हस्ते झाले.
स्पर्धेत एकूण आठ संघ व आठ संघ मालक सहभागी झाले होते. प्रास्ताविक, सूत्रसंचालन करून आभार संघटनेचे सचिव विलास रुमडे यांनी मानले. स्पर्धा दिवस-रात्र प्रकाशझोतात घेण्यात आली. स्पर्धेत पंच म्हणून राजू भावे, नीलेश गावकर, इसाक रखांगी, सुरेंद्र सकपाळ यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सभासद व खेळाडू यांनी सहकार्य केले. स्पर्धेचा सविस्तर निकाल अनुक्रमे असा ः ओम गणेश शिरगाव संघ विजेता, जामसंडे इंडियन्स संघ उपविजेता आदींसह तृतीय देवगड किल्ला संघ, चतुर्थ जोग मेडिकल संघ, उत्कृष्ट शूटर नीलेश गावकर (जामसंडे इंडियन्स), उत्कृष्ट लिफ्टर तेजस परब (ओम गणेश शिरगाव), उत्कृष्ट नेटमन वैभव सावंत (ओम् गणेश शिरगाव) यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
0 Comments