रात्री कडधान्य भिजवायला विसरलात? या ५ टिप्स वाचवतील वेळ आणि पैसे
Kitchen Tips: आज आपण काही उपाय पाहणार आहोत ज्यामुळे रात्रभर न भिजवता सुद्धा आपण कडधान्य तयार करू शकता. चला तर मग या वेळ व पैसे वाचवणाऱ्या टिप्स पाहूया…
दर दिवशी वेगळी भाजी कोणती बनवावी हा प्रश्न जवळपास प्रत्येक गृहिणीला किंवा त्या त्या घरात स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येकालाच पडतो. पालेभाज्या किंवा गवार, भेंडी सारख्या भाज्या करायच्या म्हणजे त्यांची पूर्व तयारीच वेळखाऊ असते, अशावेळी एखादे कडधान्य भिजत घातले आणि त्यात दुसऱ्या दिवशी साधे मसाले व बटाट्याच्या फोडी करून टाकल्या की झटपट भाजी तयार होऊन जाते. आता ही प्रक्रिया सोपी असली तरी काही वेळा ठरवूनही आपण कडधान्य भिजत घालायला विसरू शकतो. अशावेळी सगळा प्लॅन फिस्कटण्यापेक्षा आज आपण काही उपाय पाहणार आहोत ज्यामुळे रात्रभर न भिजवता सुद्धा आपण कडधान्य तयार करू शकता. चला तर मग या वेळ व पैसे वाचवणाऱ्या टिप्स पाहूया…
१) छोले, काळे चणे किंवा वाटाणे झटपट शिजण्यासाठी तुम्ही प्रेशर कुकरमध्ये पाण्यात किंचित बेकिंग सोडा किंवा इनो घालून काही शिट्ट्या द्या. मीठ टाकल्यास कडधान्य शिजण्याचा वेगही वाढू शकतो.
२) तुम्हाला रात्रभर कडधान्य भिजवायला जमले नसेल तर सकाळी तुम्हाला जेव्हा लक्षात येईल तेव्हा एका भांड्यात कडक गरम पाणी ओतून त्यात ही कडधान्य एक तास भिजवून ठेवा. पाणी गरम असल्याने तुमचे काम सोपे होऊ शकते. शक्यतो असे भांडे घ्या ज्याला झाकण असेल. या वेळात तुम्ही अन्य स्वयंपाक करू शकता व तासाभराने या भाजीला कुकरमध्ये फोडणी देऊ शकता.
३) एक सोपी टीप म्हणजे तुम्ही जेव्हा दुकानातून कडधान्य घरी आणता तेव्हा डब्ब्यात भरून ठेवण्याआधीच त्यांना कडक उन्हाळयात वाळवून घ्या जेणेकरून आयत्या वेळी त्यांना भिजवून फुलवून आणण्याचा वेळ कमी होऊ शकतो.
४) कुकरमध्ये कडधान्य शिजवताना चिमुटभर हळद कडधान्यामध्ये मिसळा ज्यामुळे भाजीला छान चव येईल आणि कडधान्य लवकर शिजेल.
५) काही जण यासाठी सुपारीचा सुद्धा वापर करतात यामुळे भाजीला चांगला फ्लेव्हर सुद्धा येऊ शकतो.
कडधान्य तासाभरात कशी भिजवायची?
तुम्हीही या टिप्स वापरून पाहा व त्यांचा कसा फायदा झाला हे कमेंट करून नक्की कळवा.
0 Comments