WTC Final 2023 : KL Rahul मुळे नशीब पालटणार, एका चांगल्या टॅलेंटड प्लेयरला मिळू शकते संधी ?

 WTC Final 2023 : जयदेव उना़डकटच्या जागी दुसऱ्या धोकादायक बॉलरची होऊ शकते एंट्री. ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या WTC फायनलआधी दोन खेळाडूंच्या जागी दोन नव्या प्लेयरला संधी मिळू शकते. दुखापतीचा फटका टीम इंडियाला बसतोय.


मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. 7 ते 11 जून दरम्यान इंग्लंडच्या केनिंगटन ओव्हल मैदानात सामना होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलआधी टीम इंडियाला झटका बसलाय. टीम इंडियाचा धोकादायक खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधून बाहेर होऊ शकतो. मागच्या सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध खेळताना केएल राहुलला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती.फिल्डिंग दरम्यान पळता, पळता त्याला दुखापतीचा त्रास झाला होता. केएल राहुलला दुखापत झाल्यानंतर बीसीसीआय त्याच्या रिप्लेसमेंटच्या शोधात आहे.अजूनही सूज आहे. “केएल राहुलला अजूनही सूज आहे. हा गंभीर विषय आहे. सूज कमी करण्यासाठी त्याला अँटी-इंफ्लेमेटरी औषध दिली आहेत. सूज कमी झाल्यानंतर त्याचं स्कॅन होईल. स्कॅन रिपोर्ट् आल्यानंतरच पुढची दिशा ठरेल” बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्ट्ला हे सांगितलं.

अशावेळी मग केएल राहुलच्या जागी कोण?

“केएल राहुल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळेल, अशी आम्हाला अजूनही अपेक्षा आहे. आमच्याकडे अजून एक महिना बाकी आहे. केएल राहुल खेळणार नसेल, तर त्याच्याजागी मयंक अग्रवालचा पर्याय आहे. आता काहीही बोलणं घाईच ठरेल” असं बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. मार्कस स्टॉयनिसच्या चेंडूवर फाफ डु प्लेसिसचा कव्हर ड्राइव्ह बाऊंड्री लाइनवर अडवताना केएल राहुलला दुखापत झाली होती.

त्याच्याजागी उमरानला फायनलच तिकीट मिळू शकतं

रोहित शर्मा शुभमन गिलसोबत ओपन करणार आहे. अजिंक्य रहाणे मीडल ऑर्डरमध्ये खेळेल. त्यामुळे मयंक अग्रवालला बेंचवर बसाव लागू शकतं. दरम्यान जयदेव उनाडकटला दुखापत झालीय. त्याचं WTC फायनलसाठी निवडलेल्या टीममध्ये सिलेक्शन झालं होतं. जयदेव उनाडकट दुखापतीमधून सावरला नाही, तर त्याच्याजागी उमरान मलिकला WTC फायनलच तिकीट मिळू शकतं.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2023 साठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

Post a Comment

0 Comments